Type Here to Get Search Results !

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोळी बांधवांची पंढरीतून भव्य मिरवणूक




जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोळी बांधवांची पंढरीतून भव्य मिरवणूक

आदिवासी कोळी बांधवांच्या दाखल्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोळी समाजातील समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी दिला इशारा.




पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागा व भीमा नदी वसल्याने कोळी बांधव मोठ्या संख्येने उपजीविकेसाठी या ठिकाणी राहत असून आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी कोळी बांधवांनी दीनदयाळ कोळीवाडा या ठिकाणाहून भव्य अशी मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये कोळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग आबालवृद्धांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. 




चंद्रभागा नदीमध्ये होडी चालवणारे चालक-मालक संघटनेने मिरवणुकीतून चक्क होडीच फिरवली ही मिरवणूक शहराच्या प्रदर्शना मार्गावरून चंद्रभागा घाटावर आणल्यानंतर चंद्रभागेत गंगाजल पूजन करून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दरम्यान पंढरपूर शहर व परिसरातील कोळी बांधवांनी चंद्रभागा जल पूजनाच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर आदिवासी कोळी बांधवांचे गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेले जातीचे दाखल्याचा प्रश्न अजूनही सरकार दरबारी सोडवला गेला नसल्याने आज पंढरपुरातील कोळी बांधव एकवटले असून राज्यातील नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना कोळी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे परंतु कोळी बांधवांचा प्रलंबित असलेला दाखल्याचा प्रश्न जर मिटला नाही तर पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी बांधव एकवटून प्रलंबित जातीच्या दाखल्यासाठी आंदोलन करतील असा इशारा या निमित्ताने पंढरपुरातील समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी दिला आहे.

91 इंडिया न्यूज नेटवर्क साठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad