रुग्णापर्यंत जायची संधी एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून आम्हाला मिळाली -डॉ बिराजदार
गंगाखेड /प्रतिनिधी
आरोग्य सुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्यच आहे. पण दत्तोबा संस्थानातील आजपासून सुरू होत असलेल्या एकदिवशी आरोग्य सुविधा केंद्र च्या माध्यमातून आम्हाला रुग्णसेवेची नवी संधी प्राप्त होत असल्याच मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ यु बि बिराजदार यांनी गुरुवारी बोलताना व्यक्त केलं.
गुरुवारी महातपुरी जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत असलेल्या दत्तोबा संस्थान दत्तवाडी येथे एक दिवशीय शासकीय आरोग्य सुविधा केंद्राच उद्घाटन हभप रामानाचार्य रोहिदास महाराज मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. हे आरोग्य सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांचा दत्तोबा संस्थानचे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार, वैद्यकीय अधिकारी डॉ ठुले, पडेगावचे चेअरमन मारोतराव निरस, वाघलगाव चे माजी सरपंच नारायणराव घनवटे, महातपुरी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, व आरोग्य कर्मचारी गायकवाड सर(mpw),वाळके सर(Deo), कांगने सिस्टर(anm),कौसर सिस्टर(anm), स्वामी मॅडम(गट प्रवर्तक), आशा कदम(आशाताई),सौ.राठोड (आशाताई)
धोंडाबाई ब्रिनगणे आदींचा गावकऱ्यांनी सत्कार केला. यावेळी या सुविधा केंद्रचे उद्घाटक म्हणून बोलताना ह भ प मस्के महाराज म्हणाले की आपण आजारी पडल्यानंतर स्वतःहून दवाखान्यात जाण्याची पद्धत रूढ आहे. पण या ठिकाणी सुरू झालेल्या शासकीय आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विभाग पेशंटच्या दारात येऊन आरोग्य सेवा पुरवतोय ही आनंदाची बाब आहे. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी हे आरोग्य सुविधा केंद्र सुरू करण्यामागची आपली भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष माधवराव दरेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तवाडी, शंकरवाडी, दत्तवाडी, तांडा, गोविंदवाडी, पडेगाव , बनपिंपळा येथील ग्रामस्थ भक्तांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा आनंद उपस्थित ग्रामस्थांनी घेतला.