भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे संपूर्ण देशभर हा अमृत महोत्सव सर्व देशभर साजरा केला जात आहे या निमित्ताने हर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण देशभर राबविले जात असून याचाच एक भाग म्हणून फलटण शहरांमध्ये सुद्धा हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्सवामध्ये उत्साहामध्ये साजरे करण्यात येत आहे यासाठी लागणारे तिरंगा ध्वज हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा ) यांच्या माध्यमातून मोफत पुरविण्यात आले आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला यावेळी जवळपास या देशांमध्ये सहाशे पेक्षा जास्त लहान मोठी संस्थाने होती यामध्ये एक महत्त्वपूर्ण व पुरोगामी विचाराचे फलटण संस्थान होते. तसेच या संस्थांनामध्ये अनेक क्रांतिकारकांना फलटण संस्थांनचा आश्रय होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वयंपूर्ण फलटण संस्थान तत्कालीन फलटणचे राजे साहेब श्रीमंत मालोजीराजे यांनी फलटण संस्थान हे देशांमध्ये विलीन केले होते विलीन करते करतेवेळी त्यांनी सुमारे तब्बल ६४ लाख रुपयांचा खजिना सरकारला सुपूर्त केला होता. व त्यावेळी भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांच्या आवाहना नुसार १० हजार एकर जमीन विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला देऊन टाकली होती.
अशा या प्रेरणादायी व गौरवशाली फलटणचा इतिहास व श्रीमंत मालोजीराजे उर्फ राजे साहेब यांचा देशप्रेमाचा समृद्ध वारसा यावर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर( महाराज साहेब ), फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ( बाबा ), सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कुटुंबीय मार्गक्रमण करीत आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव फलटण शहरातील तालुक्यातील सर्वांनीच मोठ्या उत्साहामध्ये व आनंदामध्ये साजरा करण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा ) यांनी केले आहे.