दिनांक ११- ०८- २०२२ रोजी बुद्धेहाळ ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सौ सुगंधा श्रीमंत गवंड यांची बहुमताने निवड करण्यात आली.
या अगोदरच्या शेकाप च्या सरपंच सौ.प्रियांका बाबासो हिप्परकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर निवडणूक जाहीर झाली असता सदर रिक्त पदाची निवड वार गुरुवार दिनांक ११-०८-२०२२ घेण्यात आली.व या रिक्त पदावरती सौ सुगंधा श्रीमंत गवंड यांची निवडणूक अधिकाऱ्यांनी निवड जाहीर केली.
यावेळी निडणुक निर्णयअधिकारी मा.सरवदे भाऊसाहेब , तलाठी मा.शिर्के भाऊसाहेब , ग्रामसेविका मा.सौ.जाविर मॅडम , पो.कॉ. मा.वाघ साहेब , पोलीस पाटील मा.गणेश लवटे पाटील उपस्थित होते.
सदर सरपंच निवड झाल्या बद्दल शेकाप जेष्ठ नेते मा. चंद्रकांत (दादा) देशमुख व पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष मा.डॉ. बाबासाहेब देशमुख ,व तसेच युवाहृदयसम्राट मा.डॉ. अनिकेत (भैया) देशमुख यांनी अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच ग्रामपंचायत सदस्य मा.ज्ञानु (दादा) कोळेकर , मा.दत्तात्रय लवटे , मा.दत्ता जाविर यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवड होते वेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य , पदाधिकारी , विविध संस्थेचे चेअरमन , संचालक व ग्रामस्थ होते.
बुद्धेहाळ ग्रामस्थांनी सौ सुगंधा श्रीमंत गवंड यांचे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...!