Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी तुपाशी शेतकरी राजा उपाशी : भिमराव भुसनर पाटील




सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी तुपाशी शेतकरी राजा उपाशी : भिमराव भुसनर पाटील

राजकीय नेते मंडळी नी शेती उत्पादनांवर तरी राजकारण करायला नको पण आपलं कोण ऐकतो.मी राजकीय नेते मंडळी पेक्षा शेतकरी बळीराजाला महत्व देतो. कारण वर्ष भर राबराब राबुन शेतकरी राजा कष्टाने ऊसाचे पीक जोमाने आणतो.खुप स्वप्न बघतो.ह्या वर्षी ऊसाचे बील आले नवीन घर बांधु नवीन मोटार सायकल घेऊ. मुलांना चांगले शिक्षण देऊ.पण सगळं उलटंच होतं. आयुष्य भर निराशा अवस्थेत जगतोय माझा शेतकरी बळीराजा.
महाराष्ट्रात कोल्हापूर आणि बारामती भागातील शेतकरी यांना चांगला दर मिळतोय ही आनंदाची बातमी आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषता सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्याचे चेअरमन मंडळी राजकीय हेवेदावे बाजुला ठेवुन एकत्र बसून सविस्तर चर्चा करुन शेतकरी बळीराजाचं मुंडक मुरगळून मलिदा खात्यातं. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बळीराजा अजून किती दिवस अन्याय सहन करणारं माहित नाही. मध्यंतरीच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.खासदार राजु शेट्टी साहेब यांनी आवाज उठवली होता.त्या वेळी जर शेतकरी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते तर हे दिवस बदलले असते...
शेतकरी बळीराजाला आव्हान करतो. सध्या महाराष्ट्रात तुम्ही पाहताय नेते मंडळी आपल्या भल्या साठी दररोज पक्ष बदलतात.मग आपणच का निष्ठा दाखवायची. ज्या दिवशी तुम्ही नेते मंडळी ना जाब विचारचाल ना तेव्हा बदल घडायला सुरुवात होईल..भविष्यात शेतकरी राजाने एकजूट होऊन संघर्ष करण्या साठी पुढे आले पाहिजे.असं मत हटकर समाज महासंघाचे अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News