पंढरपूर | एम के सी एल च्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त नितीन आसबे यांना राज्यस्थरीय पुरस्कार
91 INDIA NEWS NETWORKगुरुवार, ऑगस्ट २५, २०२२
0
नितीन आसबे यांना राज्यस्थरीय पुरस्कार पंढरपूर- (प्रतिनिधी) पंढरपूर येथील आय आय टी कॉम्पुटर एज्यूकेशन सेंटर चे संचालक नितीन आसबे यांना एम के सी एल च्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त नेहरू सेंटर मुंबई येथे राज्यस्तरीय "सर्वोत्कृष्ठ व्यवसाय कामगिरी" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष ड्रॉ चारुदत्त मायी व एम के सी एल च्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ यांचे हस्ते देण्यात आला. सलग पाच वर्षे पंढरपूर शहर व परिसरामध्ये एमएस-सीआयटी, क्लिक कोर्सेस, आय टी एज्यूकेशन व विविध सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्यातुन एकमेव असे आय आय टी कॉम्पुटर एज्यूकेशन पंढरपूर ची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण कार्यक्रमासाठी भारतीय अनुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष ड्रॉ अनिल काकोडकर, मराठी विद्यापरिषदे चे अध्यक्ष जे बी जोशी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर माजी डायरेक्टर जनरल ड्रॉ अनंत सरदेशमुख, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री ड्रॉ निशिगंधा वाड (देऊळकर) यांच्या सह महाराष्ट्रातील सर्व संगणक चालक व बहुसंख्य शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्तित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन आसबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.