अजय निळे यांची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने विशेष सत्कार.
सांगोला/
आज वाणीचिंचाळे येथे ग्रामपंचायत कार्यालयात गावातील हटकर समाज संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल तसेच लोकशक्ती चे पत्रकार नामदेव लकडे ,एकमत चे सचिन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातुन यांचे कौतुक केले. तसेच भविष्यात चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच बाबुराव सोपे, लक्ष्मण निळे, विकास गडहिरे, जितेंद्र गडहिरे ,विमा प्रतिनिधी डी. एस. निळे यांनी मनोगते व्यक्त केली.
अतिशय छोट्या वयात अजय निळे यांनी अतिशय कमी वयात उल्लेखनीय यश मिळवले आहे. हे गावातील तरुणांनी लक्षात घेऊन आपली प्रगती करावी असे सांगितले.तसेच गावातील सर्व युवकांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन गावाचे नाव उज्वल करावे.यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना उद्योग व्यवसाय, सैन्यात तसेच इतर परीक्षेत प्रोत्साहन देऊन सहभागी करावे.तसेच पत्रकांरानी सांगोला तालुक्यातील वंचित असलेल्या वाणी चिंचाळे गावचा शेतीच्या पाण्याचा प्रश्नावर आपल्या लेखणीतून न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.अजय निळे यांनी सातासमुद्रापार गरुड झेप घेतली असल्याने सर्व ग्रामस्थ, व वाणी चिंचाळे पंचक्रोशीत या युवकाचे अभिनंदन होत आहे
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव सोपे, तर सुत्रसंचालन लक्ष्मण निळे तर आभार प्रदर्शन जितेंद्र गडहिरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर निळे व समस्थ हटकर समाजाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी माजी सरपंच बाबुराव सोपे, मा. सरपंच लक्ष्मण निळे युवक नेते जितेंद्र गडहिरे,युवा सेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ गायकवाड वि.का.से.सो चेअरमन मोहन झाडबुके उदयोगपती महादेव येजगर, महादेव गायकवाड, महादेव घुणे, दादासो घुणे, बापू निळे, शरद पाटील, तसेच राशीनचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.