शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख व पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.डॉ.बाबासाहेब देशमुख व तसेच युवाहृदयसम्राट मा.डॉ.अनिकेत (भैया) देशमुख सरचिटणीस मा.दादासो बाबर (शेठ) व तसेच डॉ.सौ.श्रुतिका लवटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.
बुद्धेहाळ येथे स्व.आमदार डॉ.भाई गणपतराजी देशमुख आबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त हनुमान मंदिर पटांगणामध्ये
स्व.आबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांनी अर्पण करून आठवडा बाजारास शुभारंभ करण्यात आला.
बुद्धेहाळ गावच्या स्थापने पासून गावातील नागरिकांना आठवडी बाजार व अत्यावश्यक वस्तुंची करण्यासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर गावी जावे लागत होते. तरी गावातील जेष्ठ मंडळी , महिला , व युवकांनी गावातच आठवडा बाजार सुरू करावा अशी मागणी बुद्धेहाळ विकास सेवा सहकारी सोसायटी बुद्धेहाळ , व तसेच बुद्धेहाळ ग्रामपंचायत यांच्याकडे मागणी केली असता त्या प्रमाणे
स्व.आबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून गावामध्ये आठवडी बाजारास उत्साहात सुरुवात झाली , व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
बाहेरील व्यापारीवर्ग , किरकोळ भाजीपाला विक्रेते यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व बुद्धेहाळ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. येथून पुढे दर रविवारी आठवडा बाजार सुरू राहील याची नोंद परिसरात ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन ग्रामपंचायत व विकास सेवा सहकारी सोसायटी संचालकांनी ,सदस्यांनी केले आहे .
या प्रसंगी सरचिटणीस दादासो (शेठ) बाबर व सर्व आजी माजी सदस्य व संचालक पदाधिकारी , ग्रामस्थ लहान थोर मंडळी माता- भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
व तसेच पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मा.डॉ.बाबासाहेब देशमुख , युवाहृदयसम्राट मा.अनिकेत (भैया) देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.