उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील ढाणकी पासुन ३-४ की.मी. अंतरावर मौजा गांजेगांव या गावात दि. ०७/०८/२०२२ रोजी आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या योजने अंतर्गत गांजेगाव येथील महिला गटांना विविध प्रकारचे लघुउद्योग उभारणी बाबत मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली असता, सभेची सुरवात उपविभागीय कृषी अधिकारी मा. डॉ. श्री. प्रशांत नाईक साहेब यांनी दीप प्रज्वलन करून केली, शेकडोच्या संख्येने महिला या सभेस उपस्थित होत्या.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या योजने अंतर्गत नाशवंत फळपिके, कोरडवाहू फळे, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, तेलवर्गीय पिके, मसाला पिके इत्यादी वर आधारित उत्पादन लघु उद्योग त्यानंतर दुग्ध उत्पादने प्रक्रिया यांच्यापासून कोणकोणत्या आणि किती प्रकारे लघुउद्योग उभारणी करता येतात याबाबत माहिती आणि मार्गदर्शन तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना (MREGS) अंतर्गत फळबाग लागवड आणि हळद प्रक्रिया उद्योग या बाबद उपस्थित मान्यवर तसेच कृषी विभाग अधिकारी यांनी मार्गदर्शन दिले.
उपाविभागीय कृषी अधिकारी मा. डॉ. श्री. प्रशांत नाईक साहेब, तालुका कृषि अधिकारी मा. श्री. गंगाधर बळवंतकर साहेब तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) श्री. सचिन माळकर सर आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान (उम्मेद) मार्फत श्री. संजय तरवरे(प्रभाग समन्वयक), श्री. बालाजी हुलकाने (CLM), सौ. साधना ताई साखरे (ICRP) तसेच अध्यक्षपदी सौ. सुधाताई जाधव (ग्राम संघ अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती. सभे साठी कृषि सहायक रेखा मधुकर लोंढे, कृषि सहायक गजानन कमठेवाड, कृषी मित्र विनोद मस्के यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य श्री. कवणे भाऊ, श्री. खानझोडे भाऊ यांनी मोलाचे योगदान दिले.
उपस्थित महिलांपैकी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत सौ. सोनाली ठाकूर, सौ. निर्मला वाठोरे, सौ. दिपाली मस्के, सौ. रेणूबाई वाढेकर, सौ. पंचफुलाबाई बिरटवार, सौ. विमलबाई लाहेवार, सौ. नीलावती साखरे, सौ. शिलाबाई कल्याणकर, सौ. कल्पना मस्के यांनी केले.