सेलू शहरातील नूतन विद्यालय समोरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती डोळ्यासमोर जागर कवींचा कवींच्या प्रतिभेचा कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन फकीरा कलामांचे सेलू व कॉम्रेड अरुण कांबळे सर यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक अशोक पाठक सर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात केली .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राध्यापक के डी वाघमारे सर यांनी भूषविले व सूत्रसंचालन बबन राठोड सर यांनी केले कार्यक्रम पारंपारिक वाद्य वाजवून सुरुवात झाली. हलगी मधुकर बावीसशे यांनी तर सनई दत्तराव घोडे यांनी वाजवली.
कार्यक्रमांमध्ये कवींच्या कवितांचे वाचन झाले त्यामध्ये प्राध्यापक अशोक पाठक सर प्राध्यापक के.डी वाघमारे सर ,श्री सुरेश हिवाळे सर ,श्री माधव गव्हाणे सर, श्री शरद ठाकस सर ,श्री दिगंबर रोकडे सर ,श्री बबन राठोड सर, श्री केदासे सर, सदगीर फारुकी सर, श्री गोविंद रोकडे सर, या सर्वांनी आपल्या कविता सादर केल्या .कार्यक्रमाचा उद्देश लोकांना अण्णाभाऊ साठे कोण होते त्यांनी लेखणीच्या जोरावर साहित्य सात समुद्रा पार कसे नेले व शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे हे होते. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी अर्जुन कसाब व सिद्धार्थ डंबळे यांनी बासरी वाजवली .अर्जुन कसाब यांनी हीरो पिक्चर मधील बासरीची धुन वाजून सर्वांना मंत्र गुप्त केले व आभार प्रदर्शन अश्विन केदाचे सर यांनी मानले.
प्रतिनिधी तथागत अवचार ता. सेलू जिल्हा परभणी