शेकाप नेते चंद्रकांत (दादा) देशमुख
केंद्र शासन एलिंको समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद सोलापूर व शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीर न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज येथे संपन्न.
प्रारंभी स्वर्गीय आमदार भाई डॉक्टर गणपतरावजी देशमुख व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांत दादा देशमुख,संस्था सचिव माननीय विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य प्राध्यापक अशोक शिंदे प्राध्यापक दीपक खटकाळे प्राध्यापक जयंत जानकर, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज चे प्रभारी प्राचार्य लक्ष्मण गावडे, उपप्राचार्य प्राध्यापक हेमंत आदलिंगे, उपमुख्याध्यापक रामभाऊ बेहेरे सर, पर्यवेक्षक प्राध्यापक नामदेव कोळेकर, राहुल मोरे सर, दत्तात्रय पांचाळ सर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सच्चिदानंद बांगर साहेब, विज्ञान महाविद्यालय सांगोला चे दिव्यांग जन समितीचे प्रमुख प्राध्यापक बाळकृष्ण कोकरे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काळुंगे साहेब, दत्ता टापरे, अरविंद केदार, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव,न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
सांगोला तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे संस्था सदस्य माननीय चंद्रकांत दादा देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना असे म्हणाले की दिव्यांग असून सुद्धा आपली उमेद न हरता जगण्यासाठी संघर्ष करताना आपण या समाज बांधवांना पाहतो या शिबिराच्या निमित्ताने त्यांना निश्चितच फायदा होईल व इथून पुढचे आयुष्य जगताना कमीत कमी संघर्ष करावा लागेल जीवन सुखकर करता येईल अशा प्रकारच्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना थेट दिव्यांग बांधवांना मिळाव्यात त्यासाठी आपण सदैव त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत जो आदर्श स्वर्गीय आमदार भाई डॉक्टर गणपतरावजी देशमुख यांनी घालून दिलेला आहे त्यांच्या आदर्शावर निश्चितच चालण्याचा आम्ही प्रयत्न करू व तालुक्यातीलच नव्हे तर परिसरातील समाज बांधवांना याचा लाभ मिळवून देऊ असेही त्यांनी पुढे सांगितले.
या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी अशा प्रकारच्या शिबिरामुळे या दिव्यांग बांधवांना केंद्र शासनाच्या योजनेचा थेट लाभ मिळेल व इतर नवनवीन योजनांसाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यांना मदत करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गव्हाणे यांनी केले.
या उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधान कार्यालयातील विद्यमान सचिव प्रवीण सिंह परदेशी व सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनीही या शिबिराला भेट दिली. यानंतर त्यांना न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या प्राचार्य केबिनमध्ये बोलावून या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांचे हस्ते पंतप्रधान कार्यालय,दिल्ली येथील सचिव प्रवीण सिंह परदेशी(IAS) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण सिंह परदेसी(IAS) यांनी स्वर्गीय आमदार डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख यांच्या विषयी बोलताना असे म्हणाले की सांगोला तालुक्याला लाभलेले ऋषितुल्य नेतृत्व, ज्यांनी गोरगरीब गरजू कष्टकरी शेतकरी बांधवांचे प्रश्न विधानभवनात मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले, असे नेतृत्व पुन्हा होणे नाही असेही ते म्हणाले व माझा सत्कार आबासाहेबांच्या फोटो जवळ करा असाही आग्रह संस्था सचिवांना केला.