Type Here to Get Search Results !

महातपुरी जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप





महातपुरी जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भोलाराम कांकरिया ट्रस्टचा पुढाकार






गंगाखेड प्रतिनिधी
महातपुरी जिल्हा परिषद शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शनिवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भोलारामजी कांकरिया ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला.




चालू शैक्षणिक हंगामात आपल्या भागातील 1000 गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प भोलारामजी काकरिया ट्रस्टच्या प्रमुख मंजूताई दर्डा यांनी केला होता. आज शनिवारी सकाळी दहा वाजता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापक बालाजी मुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून भोलारामजी कांकरिया ट्रस्टचे सिद्धार्थ दर्डा, ऋषभ दर्डा, सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर ,अमर करंडे, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, ग्रामपंचायत सदस्य दीनानाथ घीसडे, माऊली मुळे, रमेश जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या 30 विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनवणे, सुर्यवंशी,राठोड ,लांडगे, बल्लाळ, जोशी मॅडम, धोंडगे मॅडम, गिरी मॅडम, भोसले मॅडम, चोबळे मॅडम, तेरकर मॅडम, मुंढे मॅडम, चिलगर मॅडॅम, नागरगोजे, रोडगे आदी शिक्षक शिक्षिकांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमां नंतर उपस्थित मान्यवरांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. शाळेच्या आवारातील झाडे ,सुंदर रंगरंगोटी, स्वच्छता, मुलींसाठींचे शौचालय वापरात असल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad