हिमायतनगर प्रतिनिधी : एम .यू .हनवते
हिमायतनगर येथील 'नालंदा बुध्दविहार' येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि.07/07/2022 श्रावण आषाढ पौर्णिमे पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित `बुद्ध आणि त्यांचा धम्म´ या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात झाली आहे.या ग्रंथाचे वाचन नियमितपणे रात्री ठीक ८:वाजता गावातील बौद्ध उपासक गौतम चांदुजी कांबळे यांच्या हस्ते होत असते .तथागत भगवान बुद्धांनी आपल्या सुखी जीवनात गृहत्याग करून सात वर्ष बोधी वृक्षाखाली तपश्चर्या करून सम्यक सम बुद्ध होऊन पंचशील तत्वे , चार आर्यसत्य ,दहा पारमिता ,सम्यक अष्टन्गिक मार्ग ,कुशल ,अकुशल कार्य ही सद् धम्मातील शिकवण देऊन समस्त मानव जातीला दुःख मुक्तीचा मार्ग दाखविला आहे.या ग्रंथाचे वाचन ऐकण्यासाठी शहरातील बौद्ध उपासक, उपासिका लहान बालक, तरुण मंडळी नेहमीच उपस्थित असतात .भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आ.प्रतापजी लोकडे सर, शिवाजी कदम सर, बाबासाहेब मुनेश्वर, भालचंद्र पोपलवार ,राजकुमार खडसे इत्यादीचे सहकार्य लाभते.