Type Here to Get Search Results !

विकासप्रिय आमदार मा. श्री संजय मामा शिंदे व राष्ट्रवादी पदवीधरचे तालुका अध्यक्ष मा. श्री रविंद्र वळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त




विकासप्रिय आमदार मा. श्री संजय मामा शिंदे व राष्ट्रवादी पदवीधरचे तालुका अध्यक्ष मा. श्री रविंद्र वळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त




आर. व्ही. ग्रुप निंभोरे मार्फत विविध शालेय उपक्रम राबविण्यात आले.





यामध्ये श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे व जि.प.प्रा.शाळा निंभोरे यामधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.




श्री छत्रपती संभाजी विद्यालयामध्ये जनरल नॉलेज व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्यवहारे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.




जि. प. प्रा. शाळेमध्ये चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धा घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शेख मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.
     स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट दिनी शाळा आयोजित कार्यक्रमांमध्ये वरील सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून हुशार विद्यार्थ्यांचा आर. व्ही. ग्रुप तर्फे सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.




       आर. व्ही. ग्रुपचे सर्वेसर्वा रविंद्र वळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक स्तरापासूनच भविष्यातील स्पर्धा परीक्षांची ओळख निर्माण व्हावी व त्यामध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. अशा स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे."




             स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा आयोजित कार्यक्रमांमध्ये संबंधित स्पर्धा परीक्षांमधील हुशार विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.




                 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 15 ऑगस्ट दिनानिमित्त आर. व्हीं.ग्रुप चे सर्वेसर्वा रविदादा वळेकर यांचे कडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.




     श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे येथील शालेय विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तसेच वस्ती शाळा, निंभोरे येथे खाऊचे वाटप करण्यात आले. 
           तसेच मागील वर्षी झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत भरभरून यश मिळवणाऱ्या *प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला* व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. अरुण दादा वळेकर व राष्ट्रवादी पदवीधर चे तालुका अध्यक्ष रविदादा वळेकर व ग्रामस्थ यांचे हस्ते गौरविण्यात आले.
    हे सर्व स्पर्धा परीक्षा आयोजन कार्यक्रम व इतर शालेय उपक्रम आर. व्हि. ग्रुप चे कार्याध्यक्ष स्वप्निल नलवडे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वळेकर यांच्या सल्ल्याने पार पडले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोडगे सर यांनी केले.
                 यावेळी ग्रुपचे अध्यक्ष ईश्वर मस्के व इतर पदाधिकारी सोमनाथ पासंगराव, गणेश वळेकर, लक्ष्मण वळेकर, राज पठाण, नाथाभाऊ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad