Type Here to Get Search Results !

रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांचा गंगाखेडात सत्कार




रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांचा गंगाखेडात सत्कार
गंगाखेड प्रतिनिधी
आजारी असलेल्या वारकरी संप्रदायातील एका वारकऱ्याच्या दवाखान्यासाठी मदत करण्याचे आवाहन करणाऱ्या रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांचा सोमवारी गंगाखेड येथील बाजारपेठेत सत्कार करण्यात आला.
 वडगाव स्टेशन येथील बचाटे महाराज हे आजारी पडले असून त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन रामायणाचार्य हभप रोहिदास महाराज मस्के यांनी केले होते. एका वारकऱ्याला मदतीसाठी एका महाराजांनी आव्हान करणे हे लोकांना चांगलेच भावले. लोक मदतीसाठी सरसावले. मदती 
साठी पुढाकार घेणाऱ्या रोहिदास महाराज मस्के यांचा सोमवारी मनीष यानपलेवार यांच्या भांड्याच्या दुकान मध्ये सत्कार करण्यात आला. यानपल्लेवार परिवारानेही उपचारासाठी रोख मदत केली. यावेळी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, वाघलगाव चे माजी सरपंच नारायणराव घनवटे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News