Type Here to Get Search Results !

लक्ष्मी टाकळीतील अवैद्य धंधे होणार बंद!.विविध विकास कामांना ग्रामसभेत मिळाली मंजुरी.




लक्ष्मी टाकळीतील अवैद्य धंधे होणार बंद!.विविध विकास कामांना ग्रामसभेत मिळाली मंजुरी.






पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील अवैद्य धंदे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला त्याचबरोबर लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्द व उपनगरातील मूलभूत गरजांना विकास कामात समाविष्ट करून विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला खेळीमेळीत झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत सर्व स्तरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
श्री दत्त मंदिर येथे सरपंच सौ. विजयमाला सचिन वाळके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत टाकळी ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय देविदास साठे, ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे. समाधान देठे, गोवर्धन देठे, सागर सोनवणे, औदुंबर ढोणे, सागर कारंडे, सौ.रेश्मा संजय साठे, सौ. रोहिणी महेश साठे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य तेसेच जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, माजी उपसरपंच महादेव देठे, शिंदे तलाठी माजी उपसरपंच सचिन वाळके, पोलीस पाटील सौ. गीतांजली गजानन इरकर, माजी सरपंच बापूसाहेब कदम,माऊली देशमुख, शिक्षक,अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य सेवक, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरज कदम, निलेश चंदनशिवे, शशिकांत देठे, सौ कावेरी भोसले, विश्वजीत नवगिरे, सौ. जयश्री वाघमारे इत्यादी कर्मचारी तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. 
ग्रामसभेमध्ये लक्ष्मी टाकळी गावातील अवैध व्यवसाय बंद करणे, डास प्रतिबंधक साठी गप्पी मासे पैदास करणे, आमदार निधीतून गावठाण व नवीन वसाहत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत मालकीच्या गायरान क्षेत्रात क्रीडांगण तयार करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, डिलिव्हरी रूम बांधणे, गावठाण कडेने रस्ता खडीकरण करणे, दलित वस्तीमध्ये बंदिस्त गटार करणे, काँक्रीट रस्ता करणे, नागरिक सुविधा योजनेतून गणपती नगर व लहुजी वस्ताद नगर ओपन स्पेस सुशोभीकरण करणे, ठक्कर बप्पा योजनेतून पारधी वस्तीमध्ये अंतर्गत गटार करणे, दिवाबत्ती सुविधा करणे, जंतुनाशक औषध फवारणी करणे, टाकळी ग्रामपंचायतचे नगरपंचायत करणे इत्यादी विकास कामांवर खेळीमेळीत चर्चा झाली. ग्रामसभेच्या सुरुवातीस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांचे स्वागत अशोक पांढरे ग्रामविकास अधिकारी यांनी केले. ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या प्रश्नांना सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी योग्य व वस्तुनिष्ठ स्वरूपाची उत्तरे दिली त्यामुळे नागरिकांचे समाधान झाले. टाकळी ग्रामपंचायतीचा कारभार स्वच्छ पारदर्शक व गतिमान करण्याचे अभिवचन सरपंच सौ. विजयमाला सचिन वाळके व ग्रामविकास अधिकारी अशोक पांढरे यांनी ग्रामसभेत दिले. त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. व ग्रामपंचायतच्या कारभारास शुभेच्छा दिल्या. ग्रामसभेत अशोक पांढरे ग्रामविकास अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कामकाज पाहीले.

91 इंडिया न्यूज नेटवर्क साठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News