Type Here to Get Search Results !

जखमी हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांची धावा धाव




जखमी हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांची धावा धाव

प्रतिनिधी
अज्ञात वाहनाच्या धडकेने चाटोरी येथे नदीच्या शेजारी जखमी झालेल्या हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर व सहकाऱ्यांनी धावपळ करत त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न बुधवारी केला केला.




चाटोरी येथील युवा कार्यकर्ते आकाश किरडे,सुशांत किरडे यांनी सकाळी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कॉल करून आमच्या भागात रोडच्या बाजूला हरिण जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती दिली. याला उपचार मिळवून देण्यासाठी आपण वनविभागाचे अधिकार्याशी संपर्क साधावा असेही कळवले. यावरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा वनाधिकारी जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ आगाव, डॉक्टर सावने व त्यांच्या सहकार्याशी संपर्क साधून सदरची माहिती कळवली. वन विभागाच्या हेल्पलाइन नंबर वर सुद्धा ही माहिती नोंदवण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधून सदरची माहिती कळवली. त्यामुळे ही यंत्रणा तात्काळ हलली. सकाळी दहा वाजता वनविभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने त्या जखमी हरणाला वाहनांमध्ये घालून परभणीच्या दिशेने घेऊन गेले. वाटेत मडसगाव पाटीवर त्याच्यावर उपचार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News