Type Here to Get Search Results !

कोंढारकी येथील नेहरू युवा मंडळाच्या रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांचा सहभाग




कोंढारकी येथील नेहरू युवा मंडळाच्या रक्तदान शिबिरात
३३ रक्तदात्यांचा सहभाग

एकाच दिवशी आला वडील आणि कन्येचा वाढदिवस

पंढरपूर : प्रतिनिधी




कोंढारकी येथील नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. तसेच रक्तदान शिबीर ही ठेवण्यात आले होते त्यामध्ये ३३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे रक्तदान सुरू असतानाच अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले व एकाच दिवशी वडिल व कन्येचा वाढदिवस पुढील वर्षापासून साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वाढदिवसानिमित्त घेतले जाणाऱ्या रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष चालू आहे या शिबिराचे उद्घाटन पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

दुपारी १ वाजता गोपाळपुर येथील मातोश्री वृद्धाश्रम मधील वयोवृद्ध व्यक्तींना मिष्टान्नभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील हे होते तर
याप्रसंगी लघु पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख, विशाल साळुंखे, तूशार चव्हाण, मुन्ना सावंत ,शिवाजी दांडगे आदी उपस्थित होते.

अमर पाटील बोलताना म्हणाले की राजेंद्र फुगारे यांनी व्यवसाय करत असताना नेहरू युवा मंडळामार्फत सामाजिक कामाची आवड मात्र चांगलीच जोपासली आहे. गेल्या चार वर्षापासून ते न चुकता वाढदिवसा दिवशी रक्तदान शिबिर तसेच गावातील प्रत्येक घरामध्ये पिण्याचे शुद्ध फिल्टरचे पाणी मोफत वाटप करून शुद्ध पाण्याबाबत नागरिकांना जागृत करण्याचे कार्य केले आहे ते नेहमीच अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत आहेत. राजेंद्र फुगारे यांच्यामुळे परिसरातील अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे तर गावातील फलकावर दररोज सुविचार लिहून त्यांनी आपला छंद जोपासला आहे असेही कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी सांगितले.गायकवाड

सदर कार्यक्रम प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष रामदास घाडगे, सासरे विलास कराळे, प्रगतशील बागायतदार समाधान गायकवाड, श्रीनिवास बनसोडे, प्रताप गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते बंडू मोरे व शेगांव दुमालाचे माऊली अटकळे, बंडू काटे, इंजिनिअर धुळाप्पा बोरकर गोपाळपूर, पंढरपूरचे विकास साळुंखे,अमर काळे तसेच नेहरू युवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad