Type Here to Get Search Results !

'तिरंगा हाती घेऊ चला , स्वातंत्र्याचं गाणं गाऊ चला' या घोषणा देत निघालेल्या " हर घर तिरंगा रॅलीने " शहर दुमदुमले




'तिरंगा हाती घेऊ चला , स्वातंत्र्याचं गाणं गाऊ चला' या घोषणा देत निघालेल्या " हर घर तिरंगा रॅलीने " शहर दुमदुमले

किनवट : 'भारतमातेचे गीत गाऊ , तिरंगा घरोघरी लावू ' , 'तिरंगा हाती घेऊ चला , स्वातंत्र्याचं गाणं गाऊ चला' ,' आझादी की शान तिरंगा , चलो हर घर लहराए तिरंगा ' ,
या घोषणा देत निघालेल्या " हर घर तिरंगा रॅलीने " शहर दुमदुमले.
       स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 13 ते 15 ऑगष्ट दरम्यान " हर घर तिरंगा " उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता .12 ) रोजी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने "(फ्रिडम जॉईन) हर घर तिरंगा रॅली" हा तालुकास्तरीय मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यात किनवट शहर व गोकुंदा येथील 13 शाळा-महाविद्यालयातील 4 हजार 575 विद्यार्थी व 205 शिक्षक सहभागी झाले होते.
       पंचायत समिती , किनवट येथून सकाळी 10:00 वा . ' हर घर तिरंगा ' रॅलीस प्रारंभ झाला. ही रॅली शहीद बिरसा मुंडा चौक, अशोकस्तंभ, राष्ट्रमाता जिजाऊ चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतीज्योती सावित्रीमाई व राष्ट्रपिता जोतीराव फुले चौक , साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौक, राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे शहरातून फिरून आली. तहसिल कार्यालयात समारोप झाला.
          यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सर्वांमध्ये देशभक्ती व संविधान जागृती विषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजक तहसिलदार डॉ. मृणाल जाधव व गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांची मंचावर उपस्थिती होती. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी आभार मानले. 
         बळीराम पाटील महाविद्यालयाच्या एन.सी.सी.चमुने पथसंचलन व 'मेरा ही जलवा' या गीतावर नृत्य सादर केले. अशोक पब्लीक स्कूल पळशीच्या विद्यार्थ्यांनी ' मेरा कर्मा तू ' , ' भारत माता की जय ' व 'आय लव्ह मॉय इंडिया ' ही नृत्य गीते सादर केली. संदीश यशीमोड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्यक्षिक आदर केले. उमेश ताटेवार (की बोर्ड ) व राहुल तामगाडगे (ऍक्टोपॅड) यांच्या संगीत साथीने सुरेश पाटील यांनी देशभक्ती गीत सादर केले.
         राष्ट्र पुरुषांच्या वेशभुषा, लेझीम पथक , देशभक्तीपर नृत्य संघ इत्यादी नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन बळीराम पाटील महाविद्यालय , सेंट मेरीस इंग्लिश स्कूल , सरस्वती महाविद्यालय , श्री बाबासाहेब मुखरे विद्यालय , सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , उत्तमराव राठोड आदर्श विद्यालय , मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालय , जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल , कास्मॉपॉलिटन विद्यालय , जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूल , निवासी मूकबधीर विद्यालय व अशोक पब्लीक स्कूल पळशी या शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य , मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते.
        या कार्यक्रमात पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी नारायण राठोड, दत्ता आडे, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, कपील करेवाड, आदिवासी सेवक उत्तम मेश्राम व डायरेक्टर एस.व्ही. रमणाराव उपस्थित होते.
91न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad