वेगवेगळ्या उपक्रमाने झाली सांगता
उमरखेड येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमिताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सकाळी दहा ते अकरा या वेळामध्ये उमरखेड शहरातील सर्व आदिवासी समाज बांधव बिरसा मुंडा चौक येथे एकत्र जमले. त्यानंतर सर्वांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी मा.उत्तमराव इंगळे ,डी बी अंबुरे, शेषराव इंगळे, अशोकराव ढोले ,कैलास गारोळे ,विठ्ठल पोटे ,चंद्रकांत खंदारे ,चंद्रकलाबाई भुरके , शारदा वानोळे , प्रकाश शिकारे ,अनिल ठाकरे,गजानन ठाकरे,यांनी अभिवादन केले.त्या नंतर उमरखेड शहरातुन भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
दुपारी २ वाजता जिजाऊ भवन उमरखेड येथे माननीय दशरथ मडावी(संस्थापक राष्टीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल ) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली.सर्वप्रथम बिरसा मुंडा याच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले.याध्ये मा.रंगराव काळे,(राज्य अध्यक्ष बिरसा क्रांती दल)हरबाई पेजेवाड,चंद्रकलाबाई भुरके,डुकरेताई (सरपंच नागापूर रुपाळा),शारदाताई वानोळे,सौ.डाखोरे ताई (न.प.सदस्य महागांव,) यांचे स्वागत करण्यात आले.स्वागतानंतर आदिवासी समाजातील या वर्षी *सेवानिवृत्त झालेले कर्मचारी* ,नामदेव गायकवाड,प्रकाश शिकारे,शेषराव इंगळे,नथ्थुजी मोरे,डाखोरे,यांचा दशरथ मडावी यांचे हस्ते शाल,व नारळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
तसेच या शहरात *नव्यानेच रुजू झालेले अधिकारी* . यामध्ये श्री भारत खेलबाडे (सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव) व श्री सुदर्शन पांडे (वनपरिक्षेत्र अधिकारी )यांचा सत्कार करण्यात आला. या वर्षी ज्या आदिवासी समाजातील मुलांना इयत्ता दहावी व बारावी मध्ये ८०% चे वर गुण घेतले अश्या पंचेविस मुलामुलींचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,व मोमेन्टो पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाध्ये बिरसा क्रांती दल *यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष* म्हणून शेषराव इंगळे, *उमरखेड शहर उपाध्यक्ष युवक फोरम* प्रसाद गव्हाळे *,उमरखेडशहर अध्यक्ष महिलाफोरम* चंद्रकलाबाई भुरके *, *विवेकानंद वार्ड बिरसा क्रांती दल शाखा अध्यक्ष* * अणिल ठाकरे,तर *उमरखेड ता.युवक फोरम अध्यक्ष म्हणून* चंद्रकांत इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.बी.अंबुरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल खुपसे यांनी केले तर आभार देविदास मुखाडे सर यांनी केले. तर मनोगत चौरे मॅडम यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी भाऊराव जुडे,चंद्रकांत खंदारे,अनंता पांडे ,रवी भुसारे विठ्ठल पोटे, संतोष मेटकर ,प्रसाद गव्हाळे,राजू खंदारे, चेतन आत्राम ,किशोर आत्राम, बाबुराव किरवले , निरंजन वाळके,प्रविन देवकर,लक्ष्मण ठाकरे, सुदाम शिरडे ,संजय अंभोरे, शांतीदास खोकले, अरुण बुरकुले, ओमप्रकाश गव्हाळे,रामदास शेळके,प्रवीण अंभोरे, वैभव मुखाडे ,उमेश रिठे, समाधान तोरकड ,उमेश फोले, सोमल गुव्हाळे , संतोष पिंपळे, अर्जुन वायकुळे, गौरव वानोळे, सुनील मुरमुरे, दीपक पाचपुते, राहुल गुव्हाळे, तर महिला सदस्य आशा ढोले,ज्योती गारोळे,विमल फोले,सत्यभामा ठाकरे,रेखा आत्राम, पंचफुलाबाई खंदारे,विमलबाई मिराशे जंगलेताई यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधव यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी मुळावा,वानेगांव,धनज,मोहदरी,पिंळदरी,जनुना,दत्तनगर मरसुळ,पोफाळी,गगनमाळ,वांगी,पारडी,रुपाळा,विडुळ,करोडी,ढाणकी,बाळदी,कृष्णापूर,मोरचंडी,खरबी, येथील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.