Type Here to Get Search Results !

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत फुलसावंगी येथील उर्दू जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी




हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत फुलसावंगी येथील उर्दू जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

माहागाव प्रतिनिधी संजय जाधव

फुलसावंगी(१२) महागाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजे फुलसावंगी येथे स्वातंत्र्यचे अमृत महोत्सव अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव प्रत्येक घरात तिरंगा या मोहिमेचे महत्त्व सांगण्यासाठी गावात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या तिन्ही शाळेतून प्रभातफेरी ला सुरुवात केली.त्या नंतर ग्रामपंचायत जवळ जाऊन गावाच्या प्रत्येक वार्डात व बसस्थानक व चौक आणि गावातील मुख्य मार्गा वरून ,हर घर तिरंगा घर घर तिरंगा ,भारत मातेचे गीत गाऊ घर घर तिरंगा लावू,अश्या घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अनिस शेख उपाध्यक्ष साजेदा परविन व सर्व सदस्य व सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष बाबू खान व उर्दू शाळेचे मुख्यध्यापक सोहेल मिर्झा,शिक्षक,साजीद खान,असिफ शेख, जावेद खान,मोहसीन पटेल, शिक्षिका,बिलकीस अंजुम, यासमीन परवीन,मसरत जहाँ,आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी प्रभातफेरीत हर घर तिरंगा अभियानात भाग घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad