Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्याकडे विचारणा




विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्याकडे विचारणा

गंगाखेड प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याच्या माहितीवरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे त्यांच्याकडे मोबाईल द्वारे विचारणा केली.
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना जिल्ह्यातील 85000 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळणे अपेक्षित होतं. या न त्या कारणाने स्वातंत्र्य दिन दोन दिवसावर आलेला असतानाही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत .शाळेतून गणवेश मिळणार असल्याने काही पालकांनी गणवेश खरेदी केला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मात्र गणवेशा विना स्वातंत्र्य साजरा करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही पालकांच्या विनंतीवरून आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शनिवारी जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्याशी मोबाईल द्वारे या संदर्भात विचारणा केली. तांत्रिक अडचणीमुळे गणवेश मिळण्यास उशीर झाला असला तरी शाळा व्यवस्थापन समितीने पैसे येईपर्यंत गणवेश घेऊन त्याला काय हरकत आहे हा पर्याय भुसारे यांनी सांगितला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad