Type Here to Get Search Results !

पूर्वसूचना न देता तोडलेल्या विजपुरवठ्याची ठीया आंदोलनानंतर जोडणी आम आदमी पार्टीचा पुढाकार




पूर्वसूचना न देता तोडलेल्या विजपुरवठ्याची ठीया आंदोलनानंतर जोडणी आम आदमी पार्टीचा पुढाकार

गंगाखेड- प्रतिनिधी
 कुठलीही पूर्वसूचना न देता शेंडगा येथील वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी तोडला .याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी उपअभियंता कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ठीया आंदोलन करताच तोडलेला विज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.




शेंडगा तालुका गंगाखेड येथील गावाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपी वरून महावितरण अधिकारी यांनी दोन दिवसापूर्वी कसलीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला. वायर व मीटरही काढून आणले. विशेष म्हणजे नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचेही मीटर घाई गडबडीत महावितरण कर्मचाऱ्यांनी काढून आणले. संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्याला संपर्क केला असता विज बिल भरल्याशिवाय मीटर बसवणे व वीजपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 




काम होत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेंडगावाशीयांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधून आमचा वीज पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. यावरून काल शुक्रवारी ग्रामस्थ व सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे आदींनी महावितरणचे उपविभागीय अभियंता कार्यालय गाठले. उपविभागीय अभियंता व्हावले साहेब यांच्याशी चर्चा करूनही यात मार्ग निघत नव्हता. अधिकाऱ्याच्या आडमुठेपणाला कंटाळत कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू केले व घोषणाबाजी ही केली. या घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला. उपविभागीय अभियंता व्हावळे यांनी आंदोलन स्थळी येऊन तात्काळ पुरवठा पूर्ववत करतो पण येते आठ दिवसात बिले भरावी लागतील असे सांगितले. ग्रामस्थांनीही आठ दिवसाच्या आत बिल भरायला होकार दर्शविला .त्यानंतर हे आंदोलन संपले. या आंदोलनात सरपंच अंतराम तिडके, संतोष दहिफळे, विष्ण केंद्रे, रवि धुले, वाल्मीक तिडके, धनजय कर, विष्ण तिडके, संजय तिडके, मानिक फड , श्रीरंग दहिफळे, विवृती निडके, शाम पंतगे ,नवनाथ दहिफळे, रामेश्वर दहिफळे ,सतीश कुंडगीर, राजेभाऊ व्हावळे सिद्धेश्वर आंधळे आदींनी सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News