"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ" या भावनेतुन फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी यांनी मलटण येथे शालेय उपयुक्त वस्तूंचे वाटप केले. युवा शिवसैनिक अक्षय तावरे यांच्यावतीने मलटण येथे शालेय उपयुक्त वस्तूंचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर इत्यादींचा समावेश होता. सदर संकल्पना ही समाजहिताची असल्याने कोणतीही दिरंगाई न करता मलटणमध्ये या शालेय वस्तूंचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. यावेळी कोणतीही कसलीही समस्या असल्यास शिवसेनेकडे संपर्क साधावा असेही नम्रपुर्वक आवाहन करण्यात आले. तसेच मंगेश खंदारे, अक्षय तावरे, आशिष कापसे, अमोल सस्ते हे आमचे नव्याने प्रवेश केलेले शिवसैनिक अशाप्रकारे लोकोपयोगी कामे करुन येथील जनतेचा विश्वास सार्थ ठरवत असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून शिवसेना, ठाकरे परिवार, शिवसैनिक व मातोश्री अतिशय मोठ्या महासंकटातुन जात असतानाही फलटण तालुका शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालुन दिलेल्या 80 टक्के समाजकारण आणि फक्त 20 राजकारण या शिवसेना पक्षाच्या मुलभूत तत्वाचा आदर्श पुन्हा एकदा फलटण शहरात दाखवुन दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी चालू परिस्थितीचा विषय डोक्यात न घेता आपण नेहमीच करत असलेली समाजोपयोगी कामं आताच्या परिस्थितीतही तशीच चालू ठेवावीत. शिवसेना आपोआपच एकसंध राहील व वाढतच जाईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना, शिवसैनिक व महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. आपण आपल्या समाजकारणातुन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करुया असे आवाहनही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे.
शालेय वस्तूंचे वाटप करत असताना शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, ग्राहक संरक्षण कक्षाचे फलटण उपशहर प्रमुख भारत लोहाना, अक्षय तावरे, मंगेश खंदारे, जयवंत पवार, आशिष कापसे, अमोल सस्ते आदी शिवसैनिक उपस्थित होते.