हिमायतनगर| प्रतिनिधी जांबुवंत मिराशे
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र यांनी प्रशासकीय पातळीवर प्रामाणिकपणे केलेल्या कर्तृत्वाची दखल घेऊन ऊपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. दि २६ जुलैपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.
गेली अनेक वर्षांपासून प्रशासनात कार्य करणारे तुषार दिलीप राठोड हे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या मौजे कोटा तांडा येथील मूळचे रहिवाशी असून, ग्रह विभाग मंत्रालय मुंबई येथे सहसचिव उपसचिवांचे स्वीयय सहाय्यक लघु लेखक म्हणून कार्यरत होते आता त्यांच्या कार्याची दखल घेऊन थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल हिमायतनगर तालुक्यातील जनतेतून अभिनंदन केले जात आहे