बँक ऑफ महाराष्ट्र श्रीपुर शाखेचा अजबच कारभार
बँक ऑफ महाराष्ट्र श्रीपुर शाखेमध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती बोगस कर्ज उचलण्यात आलेली होती
यासंदर्भात शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन व अर्ज केलेली होते परंतु यासंदर्भात दोशी वरती कार्यवाही होण्याऐवजी शेतकऱ्यांवरती बँकिंग कडून गुन्हे दाखल होत आहे
यामुळे नेमके शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न निर्माण होत आहे शेतकऱ्यांची पहिली तक्रार असून देखील गुन्हा शेतकऱ्यांवरतीच गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तरी या शेतकऱ्यांना न्याय तरी कधी मिळणार
पोलीस प्रशासन बँक प्रशासन आज पर्यंत डोळे झाकूनच बसले आहे का 2013 14 पासून बँकेचे नेमके ऑडिट झाले होते का नव्हते हा प्रश्न देखील जनसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे
यामध्ये नेमकं ऑडिट कोणी केलं या गोष्टीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती का का यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत पोलीस प्रशासन हे फक्त बँकेच का ऐकत म्हणून नेमका शेतकऱ्यांना दिलासा कधी भेटणार