या दिंडीच्या निमित्ताने गावात शैक्षणिक तसेच पर्यावरणाचे रक्षण यासाठी संदेश देण्यात आला.
दिंडीच्या निमित्ताने विविध खेळ घेऊन महाराष्ट्राची लोक परंपरा कायम आभारीत राहावी यासाठी संदेश दिला.
दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून गावातील प्रतिष्ठित समाजसेवक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय रविदादा वळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद रुपी अल्पोपहार दिला तसेच लुनावत परिवाराकडून विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून खाऊ वाटप केले.
यावेळी रविदादा वळेकर,भालुकाका गुरव, नाथाभाऊ शिंदे,दत्ताभाऊ वळेकर, प्रवीण वळेकर, ईश्वर मस्के,ज्ञानेश्वर वळेकर, समाधान कारंडे, गणेश वळेकर आदी ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग,मुध्याध्याक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.