Type Here to Get Search Results !

माळशिरस | जांबुड येथे शिर्डी साईबाबा पालखीचे उभे रिंगण सोहळा संपन्न




श्रीपुर प्रतिनिधी

जांबुड( ता माळशिरस)येथे शिर्डी साईबाबा पालखीचे उभे रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जांबुड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




गुरुवारी सायंकाळी ५:३० वा साईबाबा पालखीचे जांबुड नगरीत आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने हलकी ,ढोल ,ताषे, बाॅजो फटाक्याची आतिषबाजी करत पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी यांच्या हातात पताका ,गळ्यात टाक ,विणा,डोक्यावर तुळस घेवून मुखी पाडूरंग,तुकोबा,माऊलींचा गजर करत संजय भीकू नायकुडे वस्ती ते खंडोबा मंदीर असे उभे रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला पडला.यावेळी जांबुड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गाव प्रदर्शना करुन पालखी दर्शनासाठी नरसिंह मंदिरात विसावली जाते.




यावेळी जांबुड गावचे सरपंच अविनाश खरात, उपसरपंच बाळुताई धुमाळ, जांबुड सोसायटीत चेअरमन राहूल खटके, नारायण पाटील, बबनराव खटके ग्रामपंचायत सदस्य महावीर माने ,नरहरी कचरे ,विलास केचे,लक्ष्मण खटके ,नानासाहेब केचे, अंबादास केचे,शिवाजी केचे,झाकीरहुसेन शेख ,विनोद धुमाळ,रविराज बनसोडे ,अंकुश धुमाळ , मुरलीधर कचरे, गणेश नलवडे,बापू मोरे,तानाजी कचरे महाराज,मनोहर कचरे,दिगंबर ताटे, नामदेव पाटील, दादा व्हर्जन महाराज, बाळासाहेब चंदनशिवे, शिवाजी नाईकनवरे ,भागवत लोहार, अमर भोसले ,यांच्यासह  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली १२ वर्षापासून शिर्डी साईबाबा पालखीचे जांबुड नगरीत येत आहे .ग्रामस्थांकडून होणारे पालखीचे स्वागत यामध्ये लहान मुलांपासून ते वृध्दांचा असलेला सहभाग व जोश बघून आम्ही सर्व जण भारावून जातो.ही परंपरा अशीच अखंडपणे चालू राहावी.

 स्वामी काशीकानंद महाराज 

 श्री १००८ महा मंडलेश्वर स्वामी परमहंस शिर्डी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News