उमरखेड तालुका प्रतिनिधी यांजकडून दिं.१३.०७.२०२२ विधवा गरीब महीला व दिव्यांग यांना आजही समाजात आदराचे स्थान मिळावे,त्यांच्या सुखदुखात समाविष्ठ होऊन,सहकार्य करण्याचे ऊद्दीष्ट सहयोग बहुऊद्देशिय विकास संस्था मरसुळ यांच्या ऊपक्रमाने विविध योजना राबऊन ऋणानुबंधाचे नाते घट्ट व्हावे,ध्येय समोर ठेऊन आज मौजे मरसुळ येथील हनुमान मंदीरात डिजिटल घड्याळ देवस्थान चरणी अर्पण करून सामाजिक कार्यकर्ते,सहयोग बहुऊद्देशिय विकास संस्थेचे अध्यक्ष तथा नारायण गुरूकुल कोचिंग क्लासेसचे संचालक गजानन नारायण वानखेडे मरसुळकर यांनी आज सामाजिक ऊपक्रम राबवण्यास प्रारंभ केला.
संस्थेमार्फत अत्यंत गरीब विधवा महीला ज्यांच्या नांवे शेती नाही,अशा निराधार,विधवा महीलांना ग्रह ऊद्योग,लघुव्यवसाय साठी लागणारे कर्ज कसे घ्यावे याचे मार्गदर्शन,वेळेवर येणार्या अडचणी, सामाजिक नवोपक्रम साठी तज्ञ मार्गदर्शकांचे विचार घेण्यात येतील.
सहयोग बहुऊद्देशीय विकास संस्था येथे गरजू गरीब ज्यांना शेती नाही अशा विधवा महीला व दिव्यांग म्हणजे ज्यांना (हात,पाय,डोळे,कान,अपंग )अशा व्यक्तींनी आपले नांव नोंदणी ९०९६७४६५१८ या मोबाईल क्रमांकावर संपूर्ण नांव,पत्ता,शिक्षण,व्यवसाय,अशी सविस्तर माहिती व्हाट्स अप वर पाठवण्यात यावी.आज शुभ प्रसंगी मरसुळ नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील ऊत्तमराव बनसोड,तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव कदम,राम भोयर,दिगांबर कदम,मारूती भोयर,अजबराव बेंडके,अश्विना वानखेडे,राजनंदीनी वानखेडे,सहयोग बहुऊद्देशिय विकास संस्थेच्या सदस्या शितलताई गजानन वानखेडे आदी गांवकरी मंडळी यावेळी उपस्थित होते,
अजंता कंपनीची डिजिटल घड्याळ हनुमान मंदीरात अर्पण केल्यामुळे वेळ,दिनांक,वार,तापमान,बघता येईल त्यामुळे मरसुळ नगरीत गावकर्यांना आनंद झाला आहे, तसेचं सर्वांनी सहयोग बहुऊद्देशीय विकास संस्थेची भविष्यात प्रगती होईल अशा शुभेच्छा दिल्या.