ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा खरूस खुर्द येथील विहिरी मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खरुस व ढाणकी परिसरात एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की, खरूस येथील रहिवासी विनायक नरवाडे यांचे किनवट रोडवर शेत असून शेतातील विहिरीमध्ये आज ते शेतात फेरफटका मारण्यास गेले असताना त्यांना अंदाजे 40 ते 45 वयोगटातील महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला.त्यांनी तात्काळ ही माहिती टेम्भूरदरा येथील पोलीस पाटील दत्तराव ब्रम्हटेके यांना फोनद्वारे कळवली. बिटरगाव पोलीस स्टेशनं चे ठाणेदार प्रताप भोस घटनास्थळी दाखल झाले व अधिक माहिती घेतली असता सदर महिलेचे नाव नबी बाई जयवंता राठोड असे असल्याचे कळाले. या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? काही घातपाताची शक्यता आहे का? याबाबत बिटरगाव पोलीस स्टेशन तपास करीत आहे. मृतदेह शवंविच्चेदनासाठी पाठविण्यात आला.