उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
यवतमाळ/उमरखेड दि.३० उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतक-यांना आर्थिक मदतीकरीता सरकारकडे मागणी करून पाठपुरावा करू असे संकेत यवतमाळ जिल्ह्यातील पुरपरिस्थितीची पाहणी करण्याकरीता विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आले असता विश्रामगृहावर त्यांना बबलु जाधव पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी मा.आमदार इंद्रनिलभाऊ नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या निवेदनातून मागणी केली असता त्यावर त्यांनी आश्वासन दिले उमरखेड तालुक्यात शेतीचे,गुराढोरांचे व घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्याना महागांव तालुक्यातील पुरस्थितीची माहीती दिली व शेतक-यांना सरसकट ५०००० रूपये नुकसान भरपाई द्यावी सोबतच बँकाकडून मिळालेले पिककर्ज हे ज्या पिकाकरीता देन्यात आले ते पिकच वाहून गेल्याने यावर्षी पिककर्जमाफी संबंधीत शेतक-यांना देण्यात यावी अशी मागणी रेटून धरावी अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा प्रत्येक ठिकाणी पंचनामा पुर्ण झाल्यावर उमरखेड तालुक्याबाबत महाराष्ट्र विधीमंडळाच्या विधानसभेच्या अधीवेशनात सरकारला धारेवर धरून मागणी पुर्ण करण्याकरीता पाठपुरावा करन्याचे आश्वासन अजित दादांनी दिले.....