गेल्या महिण्याभरापासुन पावसाने हाहाकार माजवला असुन प्रचंड अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी नाल्या लगतची शेती खरडून निघाली आहे, आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडले असतांना सराकार, प्रशासन मदत देण्यासाठी अत्यंत उदासीन दिसत आहे,कुठल्याही प्रकारची घोषना अजून सरकारने केलेली नसून तातडीने अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे असे मत यावेळी आंदोलनात बोलतांना काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्ती केले.
इस्लापुर फाटा येथे कॉ.अर्जुन आडे यांच्या नेतृत्वात किसान सभेचा रास्ता रोंको संपन्न झाला.
इस्लापुर, जलधरा, शिवणी, अप्पारापेठ मंडळात रेकार्ड पावसाची नोंद झालेली आहे, संपूर्ण शेती पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले असताना राज्य शासनाकडून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी यावेळी आंदोलनात करण्यात आली.
यावेळी स्थानिक घरकुल,रस्ते च्या मागणी संदर्भात प्रशासनाने दखल घेते,इस्लापुर, जलधरा विभागातील, भंडारवाडी,पिंपरी,पांगरी,भिसी,कोसमेट,तोंटबा या रस्ता बाबात तातडीने काम सुरू करण्याचे लेखी दिले,तर घरकुला बाबत वंचित लाभार्थीनां ' ड` यादीत सामिविष्ट करण्याचे यावेळी लेखी प्रशासनाकडुन देण्यात आली.
शेती पिकांच्या नुकसान भरपाईबाबात योग्य पाठपुरावा करुन जास्तीत जास्त नुकसान भरापाई मिळवून असे प्रशासनाच्या वतिने आश्वासन दिल्या नंतर आंदोलनाची सांगता जाहिर सभेने करण्यात आली. योग्य नुकसान भरपाई आणि वन जमिनीचे पट्टे लवकरात लवकर न मिळाल्यास हजारो शेतकऱ्यांना घेऊन जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी किसान सभेचे नेते कॉ.अर्जुन आडे यांनी दिला.
रास्ता रोकों आंदोलनामुळे दोन तास वाहतूक खोळबंली, आंदोलन यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे खंडेराव कानडे,शेषराव ढोले,आनंद लव्हाळे, राम कंडेल,सिनु हळदे,विजय जाधव,प्रशांत जाधव, मोहन जाधव नंदगावकर, प्रकाश वानखेडे, नारायण वानोळे , तुकाराम व्यवारे, साईनाथ फोले, सुदाम बरगे,रंगराव चव्हाण, अंबर चव्हाण, यंशवत राठोड,ईश्वर राठोड, विठ्ल राठोड, अनिल आडे ,लकशिन राठोड,साईनाथ राठोड, बाबु पवार,प्रकाश ढेरे आदि कार्यकर्तेनीं परीक्ष्रम घेतेले.
आंदोलनाला संरपच संघटनेचे शिवाजी भुरके ,वंचित आघाडीचे विलास भालेराव यांनी पांठिबा दिला.
नुकसान भरपाई मिळालाच पाहिजे,घरकुल,जमिन आमच्या हक्का ची,लाल सलाम,लाल सलाम या घोषनांनी आंदोलनकर्तनीं परीसर दणादुण सोडले.
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर