Type Here to Get Search Results !

सांगोला पंचायत समिती निवडणूक जुनोनी गटातून गौडवाडीचे समाधान दादा गडदे इच्छुक उमेदवार





सांगोला तालुक्यातील लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव असलेल्या गौडवाडी ला सध्या सांगोला तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जूनोनी पंचायत समिती गणातून मानणारा व त्यांच्या प्रती निष्ठा ठेवणारा अनेक गट ,निष्ठावंत कार्यकर्ते , हितचिंतक वर्ग,या जूनोनी पंचायत समिती गणात आहेत.

सध्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सांगोला पंचायत समिती निवडणुकीमध्ये जूनोनी येथील एक निष्ठा ठेवून प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने सामान्यातील सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले आणि तळागळातील वंचित लोकांना न्याय देण्याची भूमिका घेणारे समाधान दादा गडदे यांना जूनोनी पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी म्हणून जूनोनी येथील निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता निष्ठावंत असलेले समाधान दादा गडदे यांना पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी .अशी अपेक्षा जूनोनी येथील निष्ठावंत असलेल्या व हितचिंतक असलेल्या या सर्व लोकांमधून व्यक्त केली जात आहे.

सध्या जूनोनी पंचायत समिती गणात निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. त्यातच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत पेक्षा सध्या पंचायत समितीला सध्या महत्त्व प्राप्त झाले असल्याने या जूनोनी पंचायत समिती गणा मध्ये अनेक जण निवडणुकीच्या तयारीने कामाला लागले आहेत.


त्यामुळे स्वतंत्र पंचायत समिती जूनोनी पंचायत समिती गणात ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा अधिक अटीतटीची लढत असल्याचे चित्र दिसणार आहे. त्यामुळे या जूनोनी पंचायत समिती गणात निष्ठावंत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यास उमेदवारी दिल्यास विजयाचा मार्ग सुकर होईल .असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.


त्यातच समाधान दादा गडदे हे गेले अनेक वर्ष झाली, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रत्येक निवडणुकीला वरिष्ठ नेत्यांचे आदेशाचे पालन करून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका करत असल्यानेच अनेक निष्ठावंतांतून समाधान दादा गडदे यांचे नाव चर्चिले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad