Type Here to Get Search Results !

19 वर्षीय बौद्ध युतीवर लग्नाचे आमिष दाखवून ३ वर्ष शारीरिक संबंध ठेवून गर्भवती असताना विष पाजून हत्या




वसमत : मौजे म्हाळशी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील दिक्षा वाठोरे या 19 वर्षीय बौध्द युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत तीन वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित करून तीन महिन्याची गरोदर असताना विष पाजून हत्या केल्याबाबत तसेच मौजे बोथी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 16 वर्षीय शिवानी वावधने या विदयार्थ्यांनीची गळफास देऊन हत्या केल्याबाबत आणि मौजे कारला तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील व्होलर समाजातील टाळीकोटे परिवाराला हळदी कार्यक्रमात बाबासाहेबांचे गाणे का वाजविले म्हणून जातीय द्वेष्यातून मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने निवेदन.




मौजे म्हाळशी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील दिक्षा रामदास वाठोरे जात बौद्ध या 19 वर्षीय युवतीला त्याच गावातील सचिन रामेश्वर बरडे जात मराठा या जातीयवादी नराधमाने प्रेमाचे आमिष दाखवून तिच्या सोबत सतत तीन वर्ष शारीरिक संबध प्रस्थापित केले त्यातून ति तीन महिन्याची गर्भवती झाली तेंव्हा आता तु आम्हाला लागत नाहीस तू महार जातीची आहेस, आमच्या घरी सून म्हणून चालणार नाहीस म्हणून त्या जातीयवादी नराधमाचा बाप रामेश्वर सूर्यभान बरडे त्याची आई शोभा रामेश्वर बरडे आणि भावजयी अश्विनी हरिदास बरडे या सर्व आरोपीन कट कारस्थान रचून त्या मुलीला व पोटालील तीन महिन्याच्या बाळाला विष पाजून जीवे मारण्याचा पर्यत केला एव्हड्यावरच न थांबता तिचे वडील हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतांना रस्त्यात अडवून ही आमच्या समोर पुन्हा जिवंती दिसली तर तुमच्या सगट खतम करून टाकू अश्या धमक्याही दिल्या रिसोड येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये इलाज चालू होता त्या हॉस्पिटलमधील डॉ. त्या आरोपीचे नातेवाईक असल्यामुळे इलाज चालू असतांनाही त्या मुलीला व तिचा नातेवाईकांना रात्रभर त्रास दिला तसेच मध्यरात्री त्या मुलीचे ऑक्सीजनही काढून टाकले आणि शेवटच्या क्षणी अकोला येथे घेऊन जाण्यास सांगितले शेवटी अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये दिक्षा या युवतीची प्राण ज्योत मावळली त्यामुळे सदर प्रकरणी आरोपितांनी संगणमत करून दिक्षा व तिच्या पोटातील तीन महिण्याच्या बाळाची हत्या केल्या प्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी कायद्या सह 306 कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे परंतु हा FIR पीडित कुटूंबावर अन्याय करणारा आहे त्यामुळे मयत मुलीच्या वडिलांचा पुन्हा जबाब नोंदवून कलम 302 नुसार गुन्हा दाखल करावा तसेच सर्व आरोपीना तात्काळ अटक करावी सदरील प्रकरण फास्ट ट्रक कोर्टमध्ये चालवून आरोपिंना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटूंबाला 50 लाखाची आर्थिक मदत देऊन पोलीस संरक्षण द्यावे.
तसेच शासकीय आदिवासी आश्रम शाळा बोथी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे दहाव्या वर्गात शिकत असलेली शिवानी सादाशिव वावधने या 16 वर्षीय विद्यार्थीनिची दिनांक 21/07/2022 रोजी गळफास देऊन हत्या करण्यात आली सदरील प्रकणात आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किशन इरबा खांडारे तसेच वसतिगृहाची वार्डन सविता विनकरे यांच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे परंतु या प्रकरणात अजून कोणी सहभागी आहे का..? प्रकरण घडवीन्या मागे अजून कुणाचा हात का..? याचा तपास सीबी आय मार्फत करून पीडित कुटूंबाला न्याय द्यावा.
तसेच मौजे कारला तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आशाबाई बबनराव टाळीकोटे जात व्होलर यांच्या मुलीच्या हळदी कार्यक्रमात डीजे वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे का वाजवता म्हणून गावातील सरपंच रमेश राठोड यांनी गुंड प्रवृतिचे लोक आणून घरात घुसून सदर कुटूंबातील महिला, पुरुष मुलांबाळासह मारहान करून महिलांचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करत कुटूंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 25/07/2022 रोजी ऍट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे त्याचा राग मनात धरून आरोपीच्या नातेवाईकांने फिर्यादी महिलेस भर रस्त्यात अडवून बलात्कार करून संपूर्ण परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत त्यामुळे दिनांक 28/07/2022 रोजी विविध कालमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्वच्या सर्व आरोपी मोकाट आहेत. मोकाट असलेल्या आरोपिंकडून पीडित कुटूंबाच्या जीवित्वास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सर्व आरोपीना तात्काळ अटक करून पीडित कुटूंबाला पोलीस संरक्षण द्यावे. सर्व प्रकरणात योग्य ती तात्काळ कार्यवाही करून पीडित कुटूंबाला न्याय द्यावा अन्यथा भीम आर्मीच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला त्यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आनंद खरे, हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती ढेंबरे,जिल्हा सचिव प्रदीप मस्के, तालुका प्रमुख किशन खरे, तालुका मार्गदर्शक रवी कुंटे, तालुका सोशल मीडिया प्रमुख हर्षद आझादे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सलागार भाई रमेश भुजबळ,जेष्ठ कार्यकर्ते उत्तममामा करवंदे, तालुका प्रवक्ता राजरत्न गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बालाजी मस्के सर, रोहिदास साखरे,पिराजी आझादे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad