किनवट तालुक्यातील झळकवाडी येथील नाल्यावर चुकीच्या पद्धतीने सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आल्याने शेतकऱ्याच्या शेतात या बंधाऱ्याचे पाणी शिरून पिकाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदरील बंधाऱ्याचे काम जलसंधारण विभागाच्या वतीने इ. स.2022 मध्ये करण्यात आले होते.
याप्रकरणी निवेदिच्या वेळी तक्रार सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती पण उपाभियंता जाधव यांनी या तक्रार ची दखल घेतलीच नाही व गावकऱ्यांचे म्हणणे न ऐकता हा बंधारा मर्जीतल्या एजन्सीला देण्यात आला हा बंधारा चुकीच्या ठिकाणावर बांधल्याने शेतकऱ्याला नुकसान सामोरे जावे लागले येथील शेतकरी झळके ,बुरकुले यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात या बंधाऱ्याचे पाणी शिरल्याने यांच्या शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी येथील सरपंच दामाजी तांबारे यांनी सा. जिल्हाधिकारी कीर्तिकरण पूजार किनवट यांच्याकडे केली आहे.
प्रतिनिधी : गजानन वानोळे