Type Here to Get Search Results !

विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रती टन २५० रुपये बँक खात्यावर वर्ग




प्रतिनिधी / टेंभुर्णी 
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये युनिट नं . १ पिपळनेर व युनिट नं . २ येथे गाळप केलेल्या ऊसासाठी प्र.मे.टन २५० रुपये प्रमाणे दूसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतक यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली . गळीत हंगाम सन२०२१-२२ मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं . १ पिपळनेर येथे २४ लाख ७८ हजार ९ २२ मे . टन ऊसाचे गाळप करून ११.५२ टक्के ( बी हेव्ही व सिरप सह ) साखर उता याने २३ लाख ४५ हजार क्विटल साखर २ उत्पादीत केलेली आहे . तसेच युनिट नं . २ करकंब येथे ६ लाख ५५ हजार ५६४ मे . टन ऊसाचे गाळप करून १० . ५३ टक्के ( बी . हेव्ही सह ) साखर उता - याने ६ लाख ६० हजार ०५० क्विंटल साखर उत्पादीत केलेली आहे . दोन्ही युनिटचे मिळून ३१ लाख ३४ हजार मे . टनाचे देशामध्ये विक्रमी गाळप केलेले आहे . ऊस गाळप हंगाम २०२१-२२ साठी युनिट नं . १ व २ कडे गाळप झालेल्या ऊसास यापुर्वी प्र.मे.टन रू .२१०० / - रुपये प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला आहे .

सध्या ऊस पुरवठादार शेतक यांना ऊस पीक मशागत , जोपासणी साठी पैशाची गरज आहे . त्यामुळे कारखान्याने येणा - या बैलपोळासणासाठी ऊस पुरवठादार शेतक - यांना उर्वरीत देय ऊस बीलापैकी प्र.मे.टन २५० / - रुपये प्रमाणे दूसरा हप्ता सर्व संबंधित ऊस पुरवठादार सभासद / बिगर सभासद शेतक - यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे . युनिट नं . १ व २ कडे गाळप झालेल्या ऊसाचे दुस - या हप्तयापोटी कारखान्याने ८७ कोटी ७६ लाख २३ हजार रूपये बँकेत वर्ग केलेली २ आहे . 


उर्वरीत तिसरा हप्त्यापोटी देय ऊस बीलाची रक्कम धोरणाप्रमाणे ऊस शेतकऱ्यांना अदा करणार आहोत . तसेच कारखान्याने ऊस गळीत हंगाम २०२१-२२ चे संपूर्ण कमिशन डिपॉझीट रक्कम ऊस वाहतुकदारांना यापूर्वीच अदा केलेली आहे . ऊस गाळप हंगाम २०२२-२३ हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे गाळप क्षमतेएवढा ऊसाचा पुरवठा होण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करार करणेची कार्यवाही स शुरू आहे . तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राट दारांना पहिला अॅडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला आहे अशी माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ . बबनराव शिंदे यांनी दिली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad