Type Here to Get Search Results !

फलटण धरणे ७२ टक्क्यांपर्यंत भरली

धरणे ७२ टक्क्यांपर्यंत भरली भाटघर, नीरा - देवघर, वीर आणि गुंजवणी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असून धरण पाणी पातळीत मात्र वाढ होत आहे.




यापैकी ४ धरणातील उपयुक्त पाणी साठा ४८.३३ टी. एम. सी. इतका असून त्यापैकी आज त्यामध्ये ३५.०५ टी.एम.सी. म्हणजे ७२.५२ % इतका पाणी साठा झाला आहे. गतवर्षी या तारखेला या धरणांची टक्केवारी केवळ ३६.२९ टक्के होती.
  या ४ ही धरण क्षेत्रात आज गुरुवार दि. २१ जुलै रोजी सकाळी संपलेल्या २४ तासात झालेला आणि आज अखेर झालेला एकूण पाऊस व धरणातील एकूण पाणी साठ्याची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.

     भाटघर 
आज ७३ मि. मी. एकूण ४८६ मि. मी. सदर धरणात आज ६५.८२ % उपयुक्त पाणी साठा आहे. 
       *नीरा देवघर* आज १२ मि. मी. एकूण ११४१ मि. मी. सदर धरणात आज ५७.६२ % उपयुक्त पाणी साठा आहे. 

       वीर
आज ०० मि. मी. एकूण १५६ मि. मी. सदर धरणात आज ९७.१२ % उपयुक्त पाणी साठा आहे.
 
      गुंजवणी
आज ७ मि. मी. एकूण १२८० मि. मी. सदर धरणात आज ७२.५२ % उपयुक्त पाणी साठा आहे. 

   फलटण तालुक्यात पावसाने उघडीप घेतल्याने पेरण्यांना वेगात सुरुवात झाली असून जिरायती पट्टयात बाजरीचा पेरा सध्या ४४ टक्क्यांवर असला तरी सप्ताहा अखेर तो ६०/६५ टक्के होईल कारण पावसाची रीप रिप थांबल्याने उर्वरित पेरण्या सुरु झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad