महाडमध्ये 9, पोलादपूरमध्ये 13, माणगावमध्ये 1 अशी 23 गावांमधील सुमारे 1535 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने सावित्री नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आणि ओहोटीमुळे एक मीटरने पाण्याची पातळी कमी होईल, अशी माहिती आहे.
25 जवानांसह एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सुदैवाने पाऊस थोडा कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही खाजगी बचाव पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांसाठी शाळा/समाजभवनात निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
कुठल्याही आपातकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि राज्य प्रशासन स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.