एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरच्या त्यांच्या कार्यालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आदी उपस्थित होते. यावेळी आमदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या.