माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ येथील ग्रा.पं.कार्यालयावर कार्यरत असलेले ग्रामसेवक अशोक विठ्ठल पंदिलवाड व सरपंच उत्तम माधवराव खंदारे यांनी शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करून दि. ०१ जुलै २०२२ रोजी जगभरातील अनेकांचे प्रेरणास्थान हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन जाणूनबुजून टाळाटाळ करत ग्रामपंचायत कार्यालयात न करता परस्पर ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवले.त्यामुळे वंसतराव नाईक प्रेमी जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याने सरपंच व ग्रामसेवक यांचे विरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या मागणी साठी गोर सेना शाखा माहूर च्या वतीने केरोळी फाटा येथे आज सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोनल करण्यात आले.यावेळी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
दि. ०१ जुलै २०२२ रोजी बंजारा समाजासह जगभरातील अनेकांचे प्रेरणास्थान हरीत क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन असल्याची जाणीव असतांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरकारी कार्यालायामध्ये शासन निर्णयानुसार जयंती उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला. परंतु शासन निर्णयाचे उल्लंघन करत मौजे गुंडवळ येथील ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामसेवक व सरपंच यांना माहिती असतांना सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयच उघडले नाही व जाणीवपूर्वक बाहेरगावी जाऊन ग्रामसेवक व सरपंच यांनी आपला मोबाईल बंद ठेवला असल्यासाचा आरोप करण्यात आला होता. शासन निर्णयाची पायमल्ली केल्याने तात्काळ सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरुध्द निलंबनासह फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गोर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी या रस्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला.सदरील आंदोलन कर्त्यांचे गटविकास अधिकारी कांबळे, व महसूल चे मंडळ अधिकारी पडकोंडे यांनी निवेदन स्वीकारून तीन दिवसात संबंधित ग्रामसेवक व सरपंचांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.गटविकास अधिकारी आंदोलन स्थळी एक तास उशिराने आल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्याला जोडणाऱ्या केरोळी फाटा दरम्यानच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली होती.