Type Here to Get Search Results !

आरक्षणामुळे कही खुशी "कभी गम" कोरपणा तालुक्यात जिल्हा परिषद दोन राखीव तर दोन सर्वसाधारण




आरक्षणामुळे कही खुशी "कभी गम" कोरपणा तालुक्यात जिल्हा परिषद दोन राखीव तर दोन सर्वसाधारण

कोरपना प्रतिनिधी: मनोज गोरे
कोरपणा तालुक्यात जिल्हा परिषद एक जागा वाढल्याने निवडणुकीमध्ये चुरस वाढली असली तरी या ठिकाणी काँग्रेस, भाजपा ,राष्ट्रवादी,शेतकरी संघटना, गोंडवाना हे राजकीय पक्ष आपल्या रणनीतीच्या आखणीला कामाला लागले असले तरी नव्याने निर्माण झालेल्या गणामुळे अनेकांच्या अपेक्षा भंग झाल्या आहे परसोडा -येरव्हान या क्षेत्रात पंचायत समिती दोन गण व झेडपी गन अनुसूचित राखीव झाल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा भंग झाले आहे तीनही गणामध्ये यावेळी चुरशीची निवडणूक होणार आहेत इच्छुकांची यादी सर्वच राजकीय पक्षाकडे या गणात दिसून येते गोंडवाना गणतंत्र पार्टीने मागील या विधानसभे च्या निवडणुकीत मतांची बाजी मारून सर्वांचे गणित या क्षेत्रात बिघडविले होते मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, इत्यादी उमेदवार रिंगणात राहणार असल्यामुळे निवडणुकीला चांगलीच चुरस वाढणार आहे वनसडी- कोळशी या गणात झेटपी सर्वसाधारण वनसडीत पंचायत समिती नामाप्र कोरशी सर्वसाधारण महिला करिता आरक्षित झाले आहेत हे क्षेत्र संमिश्र असून इथे कोणत्याही एका पक्षाचे प्राबल्य नसल्याने व नवीन गन निर्माण होऊन यामध्ये आदिवासी भागातील पाच ग्रामपंचायत समाविष्ट झाल्याने या क्षेत्राचे समीकरण बदलणार आहेत त्यामुळे सुज्ञ मतदारांचा गण म्हणून पाहिल्या जात आहे तर उपरवाही- नांदा हे औद्योगिक क्षेत्रातील गण असून मोठ्या प्रमाणात कामगार मतदार म्हणून हक्क बजावणार आहे ही झेडपी जागा सर्वसाधारण असून उपरवाही पंचायत समिती गण सर्वसाधारण तर नांदा सर्वसाधारण महिला करिता आरक्षित आहेत यामध्ये कामगार क्षेत्रातील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारीसाठी धडकणार आहे भोयेगाव -आवारपुर झेडपी सर्वसाधारण महिलेकरिता असून आवारपुर -नारांडा हे औद्योगिक परिसरातील क्षेत्रात समाविष्ट आहे या ठिकाणीच काँग्रेस शेतकरी संघटना भाजप अशी तुल्यबळात लढत होत असून तीन पक्षांमध्ये स्पर्धा दिसून येते पंचायत समिती आवाळपूर अनुसूचित जाती महिला करिता आरक्षित असून हिरापूर व आवारपुर ही दोन्ही ही गावे अनुसूचित जातीचे प्रभाग असल्याने क्षेत्र आहे तर भोयगाव पंचायत समिती गणाकरिता सर्वसाधारण उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे या क्षेत्रात यापूर्वी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांना संधी हुखकल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे चारही प्रभागात गणाची फेर रचनेमुळे अनेकांचे गणित चुकणार आहे यापूर्वीच काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या परसोळा - येरगावन क्षेत्राचा सुद्धा प्रभाग रचनेमुळे छेद पडले असल्याचे दिसते कोळशी वनसडी या मतदारसंघांमध्ये आजी-माजी आमदार यांचे गावे समाविष्ट असल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्राबल्य उमेदवार त्या क्षेत्रातून ठेवण्याची धडपड सुरू आहे तर भाजप ही मधून क्षेत्रा बाहेरील उमेदवार ठेवण्याच्या तयारीत आहे तर शेतकरी संघटना व काँग्रेस हे एकाच परिवारातील दोन उमेदवार भाऊ-भाऊ आमने- सामने रिंगणात राहण्याची शक्यता आहे यामुळेच निवडणुकीतील तुरस वाढून बाजी कोण मारतो हे पाहणे अवचि त्याचे राहणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad