Type Here to Get Search Results !

ऊस लक्ष 125 टन एकरी या प्लॉटची पाहणी व शिवार फेरीचे आयोजन




गुरुवार ,दिनांक. 28 /7/2022 रोजी .श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर,आपल्या उद्दिष्ट 100 प्लस या ऊस ग्रुपच्या माध्यमातून ,तसेच सोमनाथ (तात्या )हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले .






या शिवार फेरीमध्ये आपल्या ग्रुपचे शेतकरी की ज्यांचे प्लॉट 100 प्लस उत्पन्न घेण्यासाठी आता एक ते दोन महिन्याचे झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन त्यांच्याकडून त्याची सविस्तर माहिती घेण्यात आली.




याशिवाय फेरीमध्ये टेंभुर्णी ,शिराळ ,सुरली ,अकोले खुर्द ,तसेच बेंबळे गावातील शेतकऱ्यांनी मोठा सहभाग व उत्साह दाखवला .तसेच सोमनाथ (तात्या) हुलगे यांनी उसाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले .तसेच सोमनाथ (तात्या) हुलगे यांच्या केळी बागेची पाहणी केली. तसेच ऊस लक्ष 125 टन एकरी या प्लॉटची पाहणी केली.




आपला ग्रुप सोमनाथ तात्या हुलगे व इतर तज्ञ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. बेंबळे येथील सोमनाथ (तात्या )हुलगे ,गणेश हुलगे राजाभाऊ कोळेकर, तसेच जैन कंपनीचे डीलर ,भोसले साहेब इत्यादी प्लॉटची पाहणी केली .अतिशय नियोजनबद्ध व सुरेख अशा प्रकारचे ऊस प्लॉट आहेत.




याशिवाय फेरीमध्ये टेंभुर्णी चे एम .के .देशमुख सर ,महेश देशमुख ,शिराळा चे गणेश पवार ,केशव तळेकर, सुरली चे रघुनाथ (दादा) कदम .अकोले खुर्द चे नागेश पानबुडे ,अंगद पाटील तसेच बेंबळे येथील संजय पवार व इतर शेतकरी उपस्थित .होते सकाळी ११ वाजलेपासून ते दुपारी 4 पर्यंत शिवार फेरी सुरू होती .




अतिशय चांगल्या प्रकारे शिवार फेरीचे नियोजन झाले .शेवटी शिवार फेरीची सांगता बेंबळे येथील महादेवाच्या मंदिरात चर्चा करून झाली .तसेच शेतीसाठी कॅमेरे ही नवीन संकल्पना गळगुंडे भाऊसाहेब यांच्या येथे पाहण्यास मिळाली .ग्रुपच्या वतीने सर्व शेतकऱ्यांचे आभार .अशाच प्रकारे शिवार फेरीचे नियोजन भविष्यात होऊ हीच विनंती धन्यवाद .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad