Type Here to Get Search Results !

पंढरपूर मध्ये वारकऱ्यांची दयनीय अवस्था झाली याला जबाबदार प्रशासन की सरकार




पंढरपूर मध्ये वारकऱ्यांची दयनीय अवस्था झाली याला जबाबदार प्रशासन की सरकार

महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून वारीचा आनंद घेता आला नाही आणि यावर्षी वारी झाली पण पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचे हाल बेहाल झाले दसमीला वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा पंढरी क्षेत्रा मध्ये प्रवेश झाल्यानंतर शेकडो पालख्या 65 एकरामध्ये पाल (राहुटी) टाकून राहतात पण तिथे सरकारचे व प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात आले सर्वेकडे चिखल पसरलेला असून पडत असणारा पाऊस बाहेर जाण्याकरता मार्ग काढून दिलेला नसल्यामुळे वारकऱ्यांना चिखलात बसावे लागले ,लाईटची व्यवस्था नव्हती ,संडास मध्ये पाण्याची व्यवस्था नाही ,शेकडो वाहने चिखलामध्ये फसले तर वाहन बाहेर काढण्याकरिता तिथल्या वाहनधारकांना तोंड बोलल्या पैसे मोजून द्यावे लागले आज सरकार पंढरपूर क्षेत्राकरिता करोडो रुपये निधी उपलब्ध होत असल्याचे सांगते पण हा निधी नेमका जातो कुठे हे कळायला मार्ग नाही वारकऱ्यांची व्यवस्था होण्याकरिता 65 एकरामध्ये जर काँक्रेटिंग केलेले असते तर आज वारकऱ्यांची ही दुरावस्था झाली नसती म्हणून येत्या समोरच्या वारीमध्ये तरी वारकऱ्यांची दुरावस्था होऊ नये त्याकरिता सरकारने त्या जागेमध्ये काँक्रेटिंग करण्याचा ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून नामदेव पायरी च्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल त्याचप्रमाणे पंढरपूर येथून यात्रेकरू परतीचा प्रवास करताना दहा तास ट्रॅफिक मध्ये सर्व वाहने अडकून होते अर्थात राजकीय मंडळी काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल इथे गुंतलेले होते आणि वारकरी काय पाणी काय चिखल काय घाण सरकार मात्र ओके अशी अवस्था झाली आहे व प्रशासनावर कुणाचा दबाव नाही त्यामुळे वारकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखे झाले तरी वारकऱ्यांच्या मागणीची त्वरित दखल घ्यावी असे आव्हान विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गणेश महाराज शेटे यांनी केलेले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad