किनवट तालुक्यातील भिसी येथील जनतेला ईस्लापूर हे मुख्य बाजारपेठ असल्याने खंते बीयाने इत्यादी वस्तू घेण्यासाठी यावे लागते पंरतु रस्त्याची दुर अवस्था असल्याने ईस्लापूर ला येण्यासाठी भिसी ते ईस्लापूर मुख्य रस्ता पाच किलोमीटर असुन, रस्त्याची अत्यंत दुर अवस्था असल्यामुळे लोकांना , कोल्हारी ,कोसमेट मार्गे पंधरा किलोमीटर अतंर लांबून यावे लागत आहे.
ईस्लापुर ते भिसी जाणाऱ्या रेल्वे ब्रिज पुलाखाली दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यात पाऊस पडल्याने आजूबाजूच्या शेतातले पाणी व गाळ वाहत येऊन रेल्वे ब्रिज खाली जमा होते.
त्यामुळे वाहतुकीसाठी ये-जा करणारे शाळेतील विद्यार्थी शेतकरी व प्रवासी यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अशी परिस्थिती या रेल्वे ब्रीज पुलाखाली झाली असून, तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनीं अथवा रेल्वे विभाग किंवा बांधकाम विभागानी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भिसी येथील जनतेला होणारा त्रास दुर करावा अशी प्रतिक्रिया येथील ग्रा.प सदस्य गजानन अनंतवार, सरपंच वर्षा गजानन मोहिते, उपसरपंच सरस्वताबाई शेषराव पालेपवाड यांनी केली आहे.
प्रतिनिधी : गजानन वानोळे