Type Here to Get Search Results !

आरक्षण काही निघाले जी,प मात्र माझ ठरल अरुण मडावी




इच्छुक आरक्षणामुळे संभ्रमित

परसोडा येरगवान जिल्हा परिषद गटामध्ये विद्यमान जिल्हा परिषद क्षेत्रात अरुण मळावी यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस
पक्षातील अनेक नेते गुडग्याला बाशिंग बांधून आहे अरूण मडावी भाजप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजप पक्षाचे तीन पंचवार्षिक सरपंच चेन्नई ग्रामपंचायत ची एक हाती सत्ता प्रस्थापित करणारे तालुक्यात संजय गांधी निराधार समितीत सदस्य म्हणून कार्यरत आदिवासी कार्यकर्ते म्हणून त्यांची कोरपणा तालुक्यात सामाजिक कामात अग्रेसर राहून सामान्य प्रश्नांची सोडवणूक करणारे मडावी जिल्हा परिषद च्या मैदानात उतरण निवडणूक जिंकण्याची मत व्यक्त केले अरुण मडावी यांनी मोठी विकासकामे झपाट्याने करत मोर्चेबांधणी केली आहे. सामान्य जनतेचा विश्वास संपादन करणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे

भाजप आणि काँग्रेसच्या अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीचा व शेतकरी संघटना
फार्म्युला काय राहणार याच्याकडेही संभ्रमित अवस्थेने बघितले जात आहे. परसोडा एरगव्हाण जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली •असून आरक्षणावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अवघ्या 1200 मताने पराभव झाला शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने उंच भरारी घेत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली तर शेतकरी संघटनेचा पत्ता कट केला

भाजपमध्ये अनेक उमेदवारांचे निवडणुकीसाठी नावे समोर येत आहे अरुण मडावी कुणाचा पत्ता कट करेल याकडे मात्र सर्व तालुक्यांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद निवडणूक ही मोठी रंगतदार होत असून येणाऱ्या निवडणुकीकरिता अनेक पक्षाने हिरवी झेंडी दाखवीत असल्याचे चित्र कोरपणा तालुक्यात पहावयास मिळत आहेत यांचा फायदा कोणत्या पक्षाला होणार हे पाहणे
उत्सुकतेचे ठरणार आहे..

भाजप पक्षाने प्रत्येक गावात पक्ष वाडीच्या कामाला लागले असल्याने भाजपचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. 
चेन्नई येथील सरपंच अरुण मडावी
 यांनी कामाच्या जोरावर निवडणूक लढवल्यास त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. एकंदरीत दोन्ही पक्षाचे पारडे जड असल्याने आरक्षणा कडे इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागले आहे मात्र अरुण मळावी यांनी आरक्षण काही निघाले तरी आपली उमेदवारी मात्र निश्चित असल्याचे मत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल

 या वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस शेतकरी संघटना राष्ट्रवादी आणि अपक्ष याचाही सामना करावा लागणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अंतर्गत मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे, पण आरक्षण कुणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहण्यासाठी राजकीय चर्चेमध्ये उत्सुकता लागली आहे.

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad