Type Here to Get Search Results !

आमदार संतोष बांगर साहेब यांनी हिंगोली येथील माधव हॉस्पिटल मधील मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉ.बगडियाचा घेतला चांगलाच समाचार.




आमदार संतोष बांगर साहेब यांनी हिंगोली येथील माधव हॉस्पिटल मधील मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉ.बगडियाचा घेतला चांगलाच समाचार.

प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टर मंडळींकडून खेड्यापाड्यातील रुग्णांकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात परंतु मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून देखील पैसे उकळण्याचा प्रकार हिंगोली येथील माधव हॉस्पिटलमध्ये घडला.

मौजे झरा येथील जिजाबाई संभाजी तडस वय 70 वर्ष या वृद्ध महिलेस तिच्या नातेवाईकांनी तब्येत खराब झाल्याने हिंगोलीतील माधव हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते तेव्हा डॉ. बगडिया यांनी आपल्याकडे पिवळ्या कोपन ची रुग्णांसाठी स्कीम असून तुम्हाला एकही रुपया लागणार नाही तुम्ही तुमच्या पेशंटला माझ्याकडेच ठेवा मी तुमचा पेशंट चांगला करून देईन असे आश्वासन दिले... मयत जिजाबाई या 3 दिवस ऍडमिट होत्या या दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांकडून तीस हजार रुपये बिल घेण्यात आले.

आज दिनांक 23 रोजी सकाळी सात वाजता सदर महिला पेशंट मयत झाला परंतु पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी खुंटीला टांगलेल्या हैवान डॉक्टरने रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मागणी केली आणि माझे उर्वरित 20 हजार रुपये बिल द्या अन्यथा मी मयत पेशंट ची बॉडी नेऊ देणार नाही अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्यावर मयत जिजाबाई तडस यांच्या नातेवाईकांनी संवेदनशील आमदार श्री संतोष बांगर साहेब यांना फोनवर घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मानवतेला काळीमा फासणाऱ्या रुग्णालयाचा व डॉ बगडियाचा आमदार बांगर यांना चांगलाच राग आला त्यांनी माधव हॉस्पिटलच्या डॉ बगडिया यांना चांगलेच धारेवर धरत मयत रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडण्याचे लूचाट प्रकार ताबडतोब थांबवा अन्यथा तुमच्या रुग्णालयात चालू असलेल्या शासकीय स्कीम मला बंद कराव्या लागतील असा सज्जड इशारा सुद्धा दिला तसेच सदर डॉ बगडिया हा माधव हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक वर्षापासून रुग्णांना लुबाडण्याचे प्रकार करत आहे.

या सर्व प्रकाराची तक्रार शासन दरबारी करून सदर रुग्णालय व डॉ. बगडिया यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी आमदार बांगर साहेब यांनी प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगितले कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने लुचाट डॉक्टरचा समाचार घेऊन माधव हॉस्पिटल बंद करण्यात येईल असा इशारा देखील आमदार बांगर यांनी यावेळी दिला यापुढे कुठल्याही गोरगरीब रुग्णांना जर एखादा डॉक्टर अनावश्यक लुबाडत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील आमदार बांगर यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies