Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थिनींना शौचालय,मुतारी नसणे ही दुर्दैवाची बाब- सखाराम बोबडे पडेगावकर




जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थिनींना शौचालय,मुतारी नसणे ही दुर्दैवाची बाब- सखाराम बोबडे पडेगावकर




गंगाखेड प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शिपायापासून पंतप्रधानापर्यंत सर्व प्रशासन एकीकडे झटत असताना जिल्हा परिषद च्या शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनी साठी साधी शौचालय व मुतारी नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शनिवारी आनंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील वृक्षारोपण कार्यक्रमा नंतर बोलताना व्यक्त केले.




 पुढे बोलताना सखाराम बोबडे पडेगावकर म्हणाले की येत्या पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर हर तिरंगा हे अभियान राबवल जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे याचा आम्हाला आनंदच आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपस्थित मुलींसाठी शौचालय, मुतारी, पिण्याचे पाणी आदि प्राथमिक सुविधा नसणे ही तमाम भारतीयांच्या दृष्टीने दुर्देवाची आणि शरमेची बाब आहे. गंगाखेड तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून पाहिजे तसं सहकार्य मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. शाळेच्या आवारात पाणी साचने, शाळा गळणे, शाळा पडायला येणे असे अनेक प्रश्न जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. असे परिस्थिती असताना आपण खाजगी शाळांची स्पर्धा कशी करणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेतील पालक रामेश्वर भोळे यांची मुलगी कार्तिकी हिच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते .कार्यक्रमास महातपुरी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, ज्येष्ठ नागरिक सखाराम दनदने ,सहशिक्षक चव्हाण सर ,पतंगे आदीसह ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad