Type Here to Get Search Results !

कोरपना| विद्यार्थ्यांनी स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरे जावे - मा आमदार वामनराव चटप | गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व करिअर मार्गदर्शन




विद्यार्थ्यांनी स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरे जावे
अड चटप ; कोरपना येथे गुणवंत गौरव व करिअर मार्गदर्शन




कोरपना-चंद्रपुर मनोज गोरे

कुठल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन शेतकरी नेते व माजी आमदार वामनराव चटप यांनी
कोरपना येथे सर्च फाउंडेशन द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , मार्गदर्शन, ब्रिटिश सरकारच्या चेवनिग शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या ॲड.दिपक यादवराव चटप , नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल प्रतिक गजाननराव बोरडे यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी सर्च फाउंडेशन चे संस्थापक इंजी.दिलीप झाडे, वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना चे माजी प्राचार्य संजय ठावरी , जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली,माजी समाज कल्याण सभापती नीलकंठराव कोरांगे, अरुण नवले,सुरेश मालेकर,माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर, माजी नगरसेवक सुभाष तुरानकर,मुरलीधर चिंचोलकर, भय्याजी मुडेवार, प्रभाकर गेडाम, अविनाश मुसळे, रत्नाकर चटप प्राचार्य राहुल उलमाले , विशाल मालेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल व राबविण्यात येणारे विविध उपक्रम व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे वचन झाडे यांनी दिले. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले.




सत्कारमूर्ती दिपक व प्रतिक यांनी स्पर्धा परीक्षेतील बारकावे व तयारी करण्याचं टिप्स सांगितल्या आणि त्यांनी मिळविलेल्या यशाचे गमक विषद केले.यापुढे आपल्या परिसरातून विविध शासकीय पदावर अधिकारी निवडले जातील असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना दहेगावकर व संध्या पोतराजे तर ललित वाघमारे सर यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad