Type Here to Get Search Results !

किनवट शहराच्या काही भागात पूरजन्य परिस्थिती २०० कुटुंबांना सुरक्षा स्थळी हलविले




किनवट शहराच्या काही भागात पूरजन्य परिस्थिती २०० कुटुंबांना सुरक्षा स्थळी हलविले

किनवट: तालुक्यात संततधार पावसाने चांगलाच कहर केला असून नदी नाले व पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.किनवट शहराच्या काही भागात पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले असता किनवट शहराच्या काही भागामध्ये पैनगंगा नदीचे पाणी घुसल्याने येथे काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.




तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जवळपास येथील २०० कुटुंबाला सुरक्षा स्थळी हलवण्यात आल्याची माहिती किनवटच्या तहसीलदार डॉ. मृणाली जाधव यांनी दिली.सदरील पूरजन्य आपत्तीग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले असता त्यांना त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पावसामुळे किनवट तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अशा पूर परिस्थितीवर प्रशासन आणि आपत्तीग्रस्त टीम करडी नजर ठेवून असल्याचे देखील सांगितले आहे.
तसेच नदीकाठच्या गावांना जिथे पूर परिस्थिती निर्माण होते अशा ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने व सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी सांगितले आहे.

किनवट प्रतिनिधी गजानन वानोळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad