तालुक्यात सतत आठवडाभरापासून पावसाची सरी चालू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे किनवट तालुक्यात गंगानगर परिसरात घराघरांमध्ये पाणीच पाणी झाले असून तसेच गजानन मंदिर संस्थान मध्ये पाणी शिरले आहे तालुक्याचा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड किनवट राज्य महामार्ग व उंबरखेड किनवट राज्य महामार्ग नदी नाल्याला पूर येऊन वाहतुकीस अडथळा होत आहे त्यामध्ये प्रवेशाचे बेहाल होत असून, तालुक्यातील मुख्य बाजारपेठ बंद असल्याने जन-जीवन विस्कळीत होताना पहावयास मिळत आहे.
या आठवडाभरापासून चालू असलेल्या पावसाने नदी नाले तुडूंब भरून वाहत असल्याने तालुक्यातील अनेक गावाच्या शेती शिवरात तलावाचे स्वरूप बनले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने ईस्लापूर, शिवणी, जलधारा , बोधडी , गोकुंदा , किनवट ,मांडवी ,सारखणी, उमरी परीसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत असताना पहावयास दिसून येत आहे. शेती पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
किनवट प्रतिनिधी :गजानन वानोळे